Jasprit Bumrah: बुमराहची ऐतिहासिक कामगिरी!; भागवत चंद्रशेखर यांच्या ‘या’ विक्रमाशी केली बरोबरी

अनेक वर्षांनंतर भारतीय मैदानावर बुमराहने असा चमत्कार घडवला की त्याचे नाव पुन्हा सुवर्ण अक्षरांनी लिहिले गेले.

Jasprit Bumrah: बुमराहची ऐतिहासिक कामगिरी!; भागवत चंद्रशेखर यांच्या ‘या’ विक्रमाशी केली बरोबरी

India vs South Africa Test Match: भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराह पुन्हा एकदा कसोटी रंगमंचावर चमकला आहे. अनेक वर्षांनंतर भारतीय मैदानावर त्याने असा चमत्कार घडवला की त्याचे नाव पुन्हा सुवर्ण अक्षरांनी लिहिले गेले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात बुमराहने धडाकेबाज कामगिरी केली. त्याच्या वेगवान आणि धारदार गोलंदाजीसमोर आफ्रिकन फलंदाज पूर्णपणे निष्प्रभ ठरले आणि संघ अवघ्या 159 धावांवर गारद झाला.

सहा वर्षांनंतर बुमराहचा ऐतिहासिक पराक्रम

बुमराहने भारतात कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम तब्बल 2019 नंतर साध्य केला आहे. पूर्वी इशांत शर्मा यांनी कोलकाता टेस्टमध्ये बांगलादेशविरुद्ध हा विक्रम केला होता. आता बुमराहने तोच मानाचा टप्पा गाठत भारतीय गोलंदाजीतील आपले वर्चस्व पुन्हा सिद्ध केले.

हेही वाचा – असे 5 खेळाडू जे ठरले संघाचे कायमचे आधारस्तंभ! फ्रँचायझींने कधीही केले नाही रिलीज

चंद्रशेखरच्या विक्रमाशी बरोबरी

या सामन्यात बुमराहने 14 षटकांत 27 धावा देत पाच बळी घेतले. कसोटी कारकिर्दीतला हा त्याचा 16 वा पाच-बळींचा टप्पा ठरला आहे. यामुळे त्याने दिग्गज भागवत चंद्रशेखर यांच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे. भारतासाठी सर्वाधिक पाच विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत रविचंद्रन अश्विन अव्वल असून त्याच्या नावे 37 पाच-बळींचे पराक्रम आहेत.

हेही वाचा – IND vs PAK : रायझिंग स्टार्स आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तानची टक्कर; जितेश शर्माच्या नेतृत्वात टीम सज्ज

दक्षिण आफ्रिकेचा कमजोर प्रतिकार

दरम्यान, आफ्रिकन फलंदाज पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारण्यात पूर्णपणे अपयशी ठरले. त्यांच्याकडून एडन मार्करामने 31 धावा करत सर्वाधिक योगदान दिले. अनेक फलंदाजांनी सुरुवात चांगली केली, मात्र भारतीय गोलंदाजीसमोर ते टिकू शकले नाहीत. बुमराहने 5 बळी घेतले, तर मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number