Match Fixing Case: क्रिकेटवर बिश्नोई गँगची दहशत; धमकीनंतर बदलला टी-20 वर्ल्डकपमधील ‘या’ संघाचा कर्णधार

कुख्यात लॉरेन्स बिश्नोई गँगने आता आपला मोर्चा क्रिकेटकडे वळवल्याचा संशय व्यक्त केला जात असून, यामुळे जागतिक क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे.

Match Fixing Case: क्रिकेटवर बिश्नोई गँगची दहशत; धमकीनंतर बदलला टी-20 वर्ल्डकपमधील ‘या’ संघाचा कर्णधार

Match Fixing Case: एकेकाळी मुंबईच्या अंडरवर्ल्डने क्रिकेट विश्वावर आपली पकड निर्माण केली होती, मात्र आता तीच काळी सावली पुन्हा एकदा खेळाच्या मैदानात परतताना दिसत आहे. कुख्यात लॉरेन्स बिश्नोई गँगने आता आपला मोर्चा क्रिकेटकडे वळवल्याचा संशय व्यक्त केला जात असून, यामुळे जागतिक क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे. विशेषतः कॅनडाच्या राष्ट्रीय संघात बिश्नोई गँगच्या सांगण्यावरून बदल करण्यात आल्याचे गंभीर आरोप समोर येत आहेत.

नेमका वाद काय? 'CBC'चा धक्कादायक खुलासा
कॅनडाची प्रसिद्ध वृत्तवाहिनी CBC ने एका डॉक्युमेंट्रीद्वारे मॅच फिक्सिंगचा मोठा पर्दाफाश केला आहे. या दाव्यानुसार, नुकत्याच झालेल्या T-20 वर्ल्ड कप दरम्यान कॅनडाच्या संघनिवडीवर बिश्नोई गँगचा प्रभाव होता. या गँगच्या दबावामुळेच ऐनवेळी संघात आणि नेतृत्वात मोठे बदल करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

कर्णधार बदलला आणि फिक्सिंगचे धागेदोरे जुळले
या प्रकरणातील सर्वात संशयास्पद बाब म्हणजे कॅनडाचा खेळाडू दिलप्रीत बाजवा याची नियुक्ती. चॅनेलने असा दावा केला आहे की, टूर्नामेंट सुरू होण्याच्या काही दिवस आधीच बाजवाचा संघात समावेश करण्यात आला. कोणताही ठोस अनुभव किंवा पार्श्वभूमी नसताना त्याला थेट कर्णधारपदी बसवण्यात आले. या अचानक झालेल्या बदलामागे बिश्नोई गँगची धमकी किंवा प्रभाव असल्याचे बोलले जात आहे.

न्यूझीलंड विरुद्धचा सामना फिक्स होता?
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या 'डी कंपनी'ने ज्या प्रकारे क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंगचे जाळे विणले होते, तसाच प्रकार आता बिश्नोई गँग करत असल्याचे तपासात समोर येत आहे. विशेषतः T-20 वर्ल्ड कपमधील कॅनडा विरुद्ध न्यूझीलंड हा सामना पूर्णपणे फिक्स असल्याचा आरोप केला जात आहे. या संशयास्पद घडामोडींनंतर आयसीसी (ICC) देखील सतर्क झाली असून, त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष प्रतिनिधीची नियुक्ती केली आहे.

हेही वाचा – Ajit Agarkar: BCCI चा मोठा निर्णय; मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्या कार्यकाळाला 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

अंडरवर्ल्डचा 'जीन' पुन्हा बाटलीबाहेर
2000 सालातील मॅच फिक्सिंगच्या काळानंतर क्रिकेटला लागलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी गळती मानली जात आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगचे नेटवर्क केवळ भारतातच नव्हे तर कॅनडा आणि जगभर पसरलेले असल्याने या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींनंतर आता क्रिकेटपटूही या गँगच्या निशाण्यावर असल्याने जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आता आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असून, यामुळे अनेक बड्या लोकांचे चेहरे समोर येण्याची शक्यता आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number