Rohit Sharma: मोठी बातमी! रोहित शर्मा ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरव

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 23 जून रोजी राष्ट्रपती भवनात आयोजित एका विशेष सोहळ्यात रोहित शर्मा याचा 'पद्मश्री' पुरस्कार प्रदान करून गौरव केला.

Rohit Sharma: मोठी बातमी! रोहित शर्मा ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरव

Rohit Sharma: भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज आणि कर्णधार रोहित शर्मा याच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 23 जून रोजी राष्ट्रपती भवनात आयोजित एका विशेष सोहळ्यात रोहित शर्मा याला ‘पद्मश्री’ पुरस्कार प्रदान करून गौरविले. रोहितच्या अद्वितीय नेतृत्वाची आणि क्रिकेटमधील उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत त्याला हा सन्मान देण्यात आला आहे. विशेषतः 2024 मध्ये रोहितच्याच नेतृत्वाखाली भारतीय संघाने दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकून देशाची मान जगभरात उंचावली होती. याच सोहळ्यात भारताचे दिग्गज माजी टेनिसपटू विजय अमृतराज यांनाही ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हरमनप्रीत कौर आणि इतर क्रीडापटूंचाही सन्मान
यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीला राष्ट्रपतींनी क्रीडा क्षेत्रातील एकूण 9 खेळाडूंची पद्म पुरस्कारांसाठी निवड केली होती. त्यानुसार, याच वर्षी मे महिन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिला देखील ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तिच्यासोबतच पॅरा-अ‍ॅथलीट प्रवीण कुमार आणि पारंपरिक मार्शल आर्ट्समध्ये मोलाचे योगदान देणारे के. पाजानीवेल यांनाही ‘पद्मश्री’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

हेही वाचा – Vaibhav Suryavanshi: टीम इंडियाची जर्सी मिळताच वैभव सूर्यवंशी भावूक; BCCI ने शेअर केला खास व्हिडीओ

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने रचले अनेक इतिहास
भारतीय क्रिकेटमध्ये रोहित शर्मा हे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व बनले असून आजचे अनेक तरुण खेळाडू त्याच्याकडे एक आदर्श म्हणून पाहतात. रोहितच्या प्रभावी नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2024 चा टी-20 विश्वचषक आणि त्यानंतर 2025 ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दोन आयसीसी (ICC) जेतेपदे आपल्या नावावर केली. याआधी, 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या भारतीय संघातही रोहितचा महत्त्वाचा वाटा होता. त्याच्याच कॅप्टन्सीमध्ये भारताने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती, परंतु अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता.

एकदिवसीय विश्वचषकातील रोहितची ऐतिहासिक कामगिरी
कर्णधारपदासोबतच रोहितने आपल्या फलंदाजीनेही अनेक जागतिक विक्रम रचले आहेत. 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात त्याने धडाकेबाज स्ट्राईक रेटने फलंदाजी करत भारताला अनेक सामन्यांमध्ये शानदार सुरुवात करून दिली. या स्पर्धेत त्याने एकूण 597 धावा कुटल्या आणि विराट कोहली (765 धावा) यांच्यानंतर तो सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला होता. यापूर्वी, 2019 च्या एकदिवसीय विश्वचषकात तर रोहितने बॅटिंगचा नवा इतिहास रचला होता. त्याने केवळ 9 डावांमध्ये विक्रमी 5 शतके ठोकत एकूण 648 धावा केल्या होत्या आणि त्या स्पर्धेत जगात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनण्याचा बहुमान मिळवला होता.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number