BCCI Pesion Scheme: खेळाडूंच्या आर्थिक सुरक्षेचा बीसीसीआयचा फॉर्म्युला! अजिंक्य रहाणेला मिळणार इतके निवृत्तीवेतन

क्रिकेट जगतात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसारखी श्रीमंत बोर्ड खेळाडूंना निवृत्तीनंतर पेन्शन देत नाहीत, मात्र बीसीसीआय ही विशेष सेवा पुरवणारे जगातील एकमेव बोर्ड ठरले आहे.

BCCI Pesion Scheme: खेळाडूंच्या आर्थिक सुरक्षेचा बीसीसीआयचा फॉर्म्युला! अजिंक्य रहाणेला मिळणार इतके निवृत्तीवेतन

Ajinkya Rahane BCCI Pension Amount: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज अजिंक्य रहाणेने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याच्या या निर्णयानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) पेन्शन धोरणाची पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे. बीसीसीआय हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड मानले जाते. क्रिकेट जगतात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसारखी श्रीमंत बोर्ड खेळाडूंना निवृत्तीनंतर पेन्शन देत नाहीत, मात्र बीसीसीआय ही विशेष सेवा पुरवणारे जगातील एकमेव बोर्ड ठरले आहे.

25 पेक्षा जास्त कसोटी खेळल्याने रहाणेला मिळणार दरमहा 70,000 रुपये
बीसीसीआयच्या पेन्शन धोरणानुसार खेळाडूंना मिळणारी रक्कम ही त्यांनी देशासाठी खेळलेल्या एकूण सामन्यांच्या संख्येवर अवलंबून असते. अजिंक्य रहाणेने भारतीय संघासाठी 85 कसोटी सामने खेळून उत्तम कामगिरी केली आहे. 1 जून 2022 पासून सुधारित झालेल्या बीसीसीआयच्या नवीन पेन्शन नियमांनुसार, 25 हून अधिक कसोटी सामने खेळलेल्या माजी खेळाडूंना दरमहा 70,000 रुपये पेन्शन दिले जाते. त्यामुळे अजिंक्य रहाणेला आता दरमहा 70,000 रुपये निवृत्तीवेतन मिळणार आहे.

हेही वाचा – India vs Pakistan: भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार; हॉकी विश्वचषकासाठी 20 सदस्यीय संघ जाहीर

बीसीसीआयच्या पेन्शन योजनेतील विविध श्रेणींचे स्वरूप
माजी खेळाडूंच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी बीसीसीआयने पेन्शन योजनेत विविध टप्पे निश्चित केले आहेत:
– 25 किंवा त्याहून अधिक कसोटी सामने: माजी पुरुष क्रिकेटपटूंना दरमहा 70,000 रुपये मिळतात.
– 25 पेक्षा कमी कसोटी सामने: पात्र माजी खेळाडूंना दरमहा 60,000 रुपये दिले जातात.
– माजी महिला आंतरराष्ट्रीय खेळाडू: पात्र महिला खेळाडूंना दरमहा 52,500 रुपये पेन्शन प्रदान केले जाते.
– 2003 पूर्वी निवृत्त झालेले प्रथम श्रेणी खेळाडू: पात्र प्रथम श्रेणी क्रिकेटपटूंना 45,500 रुपये दिले जातात.
– इतर पात्र प्रथम श्रेणी खेळाडू: उर्वरित पात्र खेळाडूंना दरमहा 30,000 रुपये पेन्शन मिळते.

प्रथम श्रेणी खेळाडूंनाही आर्थिक सुरक्षा; 2004 मध्ये झाली होती सुरुवात
बीसीसीआयची ही पेन्शन योजना केवळ आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या खेळाडूंपुरतीच मर्यादित नाही, तर देशांतर्गत प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या खेळाडूंनाही यात समाविष्ट केले जाते. खेळाडूंना निवृत्तीनंतर आर्थिक अडचण भासू नये म्हणून बोर्डाने 2004 मध्ये ही योजना सुरू केली होती. सुरुवातीला केवळ 174 माजी खेळाडू आणि अधिकाऱ्यांना दरमहा 5,000 रुपये दिले जायचे. 2022 मध्ये या रकमेत मोठी वाढ करून खेळाडूंना भक्कम आर्थिक सुरक्षा पुरवण्यात आली आहे.

हेही वाचा – ODI World Cup 2027 : वनडे वर्ल्ड कपबाबत मोठी अपडेट; ICC कडून पात्रता फेरीच्या तारखा जाहीर

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number