BCCI New Rule: वयाच्या फसवणुकीवर BCCI चा चाबूक! बनावट कागदपत्रे देणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई

पूर्वी रसिक सलाम, प्रिन्स यादव, मनजोत कालरा आणि नितीश राणा यांसारख्या खेळाडूंवर वयाबाबत चुकीची माहिती दिल्यामुळे कडक कारवाई करण्यात आली होती.

BCCI New Rule: वयाच्या फसवणुकीवर BCCI चा चाबूक! बनावट कागदपत्रे देणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई

BCCI New Rule: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) खेळात पारदर्शकता आणण्यासाठी आणि वयाच्या खोट्या माहितीद्वारे होणारी फसवणूक पूर्णपणे थांबवण्यासाठी अत्यंत कडक धोरण अवलंबले आहे. पूर्वी रसिक सलाम, प्रिन्स यादव, मनजोत कालरा आणि नितीश राणा यांसारख्या खेळाडूंवर वयाबाबत चुकीची माहिती दिल्यामुळे कडक कारवाई करण्यात आली होती. अशा गैरप्रकारांमुळे खऱ्या आणि गुणवान खेळाडूंचे होणारे नुकसान टाळण्यासाठी मंडळाने आता कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर, खेळाडूंनी दिलेल्या कागदपत्रांची निष्पक्ष आणि अचूक तपासणी करण्यासाठी एका स्वतंत्र बाह्य तपासणी संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे.

कागदपत्रांची कठोर तपासणी आणि ऑनलाइन पडताळणी प्रक्रिया
नवीन प्रणालीनुसार, ही विशेष संस्था खेळाडूंच्या जन्म दाखल्यांची कसून पाहणी करणार आहे. त्यासाठी खेळाडूंचे शाळा सोडल्याचे दाखले, जन्माची प्रमाणपत्रे आणि इतर संबंधित सरकारी कागदपत्रे थेट संबंधित शाळा, महाविद्यालये किंवा सरकारी कार्यालयांकडून पडताळून पाहिली जातील. याशिवाय, सर्व कागदपत्रांची डिजिटल तसेच बायोमेट्रिक पद्धतीने ऑनलाइन चाचणी केली जाणार आहे. आगामी हंगामात नवीन संघ किंवा राज्याकडून खेळू इच्छिणाऱ्या सर्व खेळाडूंसाठी 1 सप्टेंबरपूर्वी आपली माहिती व बायोमेट्रिक तपशील सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

दोषींवर थेट बंदीची टांगती तलवार आणि कारणे दाखवा नोटीस
तपासणीदरम्यान कोणत्याही खेळाडूने वयाची खोटी आकडेवारी दिल्याचे सिद्ध झाल्यास, त्याच्यावर सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक क्रिकेटमधून थेट बंदी घातली जाईल. अशा खेळाडूंना कोणत्याही वयोगटातील किंवा राज्याच्या संघात स्थान दिले जाणार नाही. मात्र, अंतिम कारवाई करण्यापूर्वी BCCI संबंधित खेळाडूला कारणे दाखवा नोटीस पाठवून आपली बाजू मांडण्याची एक संधी देईल. खेळाडूकडून आलेले स्पष्टीकरण असमाधानकारक आढळल्यास त्याच्यावर तात्काळ आणि कठोर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल.

हेही वाचा – Rohit Sharma Post : "तु नेहमीच इतरांपेक्षा वेगळा…" रहाणेच्या निवृत्तीने हिटमॅन भावुक! मध्यरात्री पोस्ट करत जुन्या आठवणींना दिला उजाळा

गुणवान खेळाडूंना न्याय आणि राहुल द्रविड यांची शिफारस
BCCI च्या या निर्णयामुळे प्रामाणिक व प्रतिभावान तरुण खेळाडूंना योग्य न्याय मिळण्यास मदत होणार आहे. यापूर्वी भारताचे माजी कर्णधार आणि माजी प्रशिक्षक Rahul Dravid यांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष वेधले होते. त्यांच्याच शिफारशीनुसार Under-19 World Cup मध्ये एका खेळाडूला केवळ 1 वेळाच खेळण्याची मुभा देण्याचा नियम लागू करण्यात आला होता. वयाचे अचूक आकलन झाल्यामुळे खेळाडूंना त्यांच्या वयानुसार योग्य तंदुरुस्ती (Fitness) आणि कौशल्याचा विकास साधणे शक्य होणार आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number