Team India Schedule : BCCI कडून 2026-27 हंगामाचे वेळापत्रक जाहीर; ऑस्ट्रेलियासह ‘हे’ चार संघ करणार भारताचा दौरा

या हंगामात भारतीय संघ एकूण 22 सामने खेळणार असून, हे सामने देशभरातील 17 वेगवेगळ्या शहरांमध्ये आयोजित केले जाणार आहेत.

Team India Schedule : BCCI कडून 2026-27 हंगामाचे वेळापत्रक जाहीर; ऑस्ट्रेलियासह ‘हे’ चार संघ करणार भारताचा दौरा

Team India Schedule: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आगामी 2026-27 च्या देशांतर्गत आंतरराष्ट्रीय हंगामाचे अधिकृत वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. या हंगामात भारतीय संघ एकूण 22 सामने खेळणार असून, हे सामने देशभरातील 17 वेगवेगळ्या शहरांमध्ये आयोजित केले जाणार आहेत. या काळात वेस्ट इंडिज, श्रीलंका, झिम्बाब्वे आणि ऑस्ट्रेलिया हे चार महत्त्वाचे संघ भारत दौऱ्यावर येणार असून क्रिकेट चाहत्यांसाठी ही पर्वणीच ठरणार आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेने होणार हंगामाची सुरुवात
टीम इंडियाच्या या देशांतर्गत हंगामाची सुरुवात सप्टेंबर महिन्यात वेस्ट इंडिजच्या दौऱ्याने होईल. या दौऱ्याचा प्रारंभ 27 सप्टेंबर रोजी होणार असून, यामध्ये 3 एकदिवसीय (ODI) आणि 5 टी-20 (T20I) सामन्यांची मालिका खेळली जाईल. एकदिवसीय सामने तिरुवनंतपुरम, गुवाहाटी आणि न्यू चंदीगड येथे होतील, तर टी-20 सामन्यांचे आयोजन लखनौ, रांची, इंदूर, हैदराबाद आणि बंगळुरू या शहरांमध्ये करण्यात आले आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धची बहुप्रतिक्षित कसोटी मालिका
या हंगामातील सर्वात महत्त्वाचे आकर्षण म्हणजे ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा. पुढील वर्षी म्हणजेच जानेवारी 2027 मध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतात येणार आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दृष्टीने ही मालिका अत्यंत निर्णायक मानली जात असून, क्रिकेट विश्वाचे लक्ष या हाय-व्होल्टेज मालिकेवर असणार आहे.

श्रीलंका आणि झिम्बाब्वेचे संघही मैदानात उतरणार
डिसेंबर 2026 मध्ये श्रीलंका संघ भारताच्या दौऱ्यावर येणार असून, या मालिकेत 3 एकदिवसीय आणि 3 टी-20 सामन्यांचा समावेश असेल. एकदिवसीय सामने दिल्ली, बंगळुरू आणि अहमदाबाद येथे, तर टी-20 सामने राजकोट, कटक आणि पुणे येथे खेळले जातील. त्यानंतर जानेवारी 2027 च्या सुरुवातीला झिम्बाब्वेचा संघ 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतात येईल. हे सामने कोलकाता, हैदराबाद आणि मुंबई या ऐतिहासिक मैदानांवर पार पडतील.

हेही वाचा – Lalit Modi On IPL : अब्जावधी रुपयांचे संघ कवडीमोल भावात? ललित मोदींच्या ट्वीटमधून आयपीएलचे 'ते' गुपित उघड

17 शहरांमध्ये रंगणार क्रिकेटचा थरार
BCCI ने या हंगामासाठी निमशहरी आणि मेट्रो अशा एकूण 17 शहरांची निवड केली आहे, ज्यामुळे देशभरातील चाहत्यांना थेट स्टेडियममध्ये जाऊन सामन्यांचा आनंद घेता येईल. या वेळापत्रकामुळे भारतीय खेळाडूंना सलग क्रिकेट खेळावे लागणार असून, आगामी विश्वचषकाच्या तयारीसाठी हा हंगाम अत्यंत महत्त्वाचा ठरेल.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number