Asha Bhosle : आशा भोसले यांचा बायोपिक बनवायचा असेल तर कोणती अभिनेत्री बेस्ट राहील? स्वतःच केला होता ‘या’ दोन नावांचा खुलासा

आशा भोसले यांच्या निधनानंतर आता त्यांच्या जीवनावरील चित्रपटाच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या असून, या भूमिकेसाठी खुद्द आशाताईंची पसंती कोणाला होती, हे जाणून घेऊ..

Asha Bhosle : आशा भोसले यांचा बायोपिक बनवायचा असेल तर कोणती अभिनेत्री बेस्ट राहील? स्वतःच केला होता ‘या’ दोन नावांचा खुलासा

Asha Bhosle Biopic : भारतीय संगीत क्षेत्रातील अढळ ध्रुवतारा, ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. 12 एप्रिल रोजी वयाच्या 92 व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आपल्या 8 दशकांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत त्यांनी 20 विविध भाषांमध्ये सुमारे 11,000 हून अधिक गाणी गायली आहेत. आशाताईंचे आयुष्य एखाद्या थरारक चित्रपट कथेसारखे आहे. गरिबीशी झुंज देत संगीत विश्वावर राज्य करण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांच्या निधनानंतर आता त्यांच्या जीवनावरील चित्रपटाच्या (Biopic) चर्चा पुन्हा सुरू झाल्या असून, या भूमिकेसाठी खुद्द आशाताईंची पसंती कोणाला होती, हे जाणून घेणे रंजक ठरेल.

बायोपिकसाठी 'या' दोन अभिनेत्रींना पसंती
डिसेंबर 2018 मध्ये एका मुलाखतीत आशा भोसले यांनी आपल्या बायोपिकबद्दल अतिशय मनमोकळेपणाने भाष्य केले होते. जेव्हा त्यांना विचारण्यात आले की, पडद्यावर तुमची व्यक्तीरेखा कोणी साकारली पाहिजे? तेव्हा त्यांनी दोन प्रसिद्ध अभिनेत्रींची नावे घेतली होती. आशाताई म्हणाल्या होत्या की, 'प्रियंका चोप्रा माझा रोल पडद्यावर परफेक्ट साकारू शकते. तसेच कंगना राणौत सुद्धा एक उत्तम अभिनेत्री असून ती माझ्या भूमिकेसाठी एक शानदार निवड ठरू शकते.' या दोन्ही अभिनेत्रींच्या अभिनय कौशल्यावर आशाताईंचा पूर्ण विश्वास होता.

हेही वाचा – Asha Bhosle: 92 व्या वर्षीही 3 तास उभं राहून केलं होतं रेकॉर्डिंग; सुदीप बॅनर्जींनी आशा ताईंबद्दलचा सांगितला 'तो' शेवटचा अनुभव

'माझ्यावर चित्रपट बनेल असे वाटत नाही'
बायोपिकसाठी नावांची निवड केल्यानंतर आशाताईंनी एक मजेशीर पण मार्मिक टिप्पणी केली होती. त्या म्हणाल्या होत्या, 'हे सर्व जरी मी बोलले असले, तरी माझ्या आयुष्यावर कधी चित्रपट बनेल असं मला वाटत नाही.' त्यांचे हे विधान त्यावेळी खूप चर्चेत राहिले होते, कारण बॉलिवूडमध्ये त्यावेळी बायोपिक्सचा ट्रेंड जोरात होता. तथापि, त्यांचे वैयक्तिक आयुष्य, लता मंगेशकर यांच्यासोबतचे नाते, आर. डी. बर्मन यांच्यावरील प्रेम आणि 1940 पासून सुरू झालेला सांगीतिक संघर्ष हा कोणत्याही व्यावसायिक चित्रपटाच्या पटकथेपेक्षा कमी नाही.

एक अविस्मरणीय सांगीतिक वारसा
आशा भोसले यांनी केवळ गाणी गायली नाहीत, तर भारतीय संगीताला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. त्यांच्या आवाजाची जादू आजही प्रेक्षकांवर कायम आहे. 2026 मध्ये त्यांच्या जाण्याने एक युगाचा अंत झाला असला, तरी त्यांनी मागे ठेवलेला 11,000 हून अधिक गाण्यांचा ठेवा पिढ्यानपिढ्या जिवंत राहील. जर भविष्यात कधी त्यांच्या जीवनावर चित्रपट बनला, तर त्यांनी सुचवलेल्या अभिनेत्रींपैकी कोणी त्यांची भूमिका साकारते की कोणी नवीन चेहरा समोर येतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

हेही वाचा – Asha Bhosle : आशा भोसलेंना श्रद्धांजली वाहताना अथिया शेट्टीची घोडचूक! पोस्ट केला 'हा' फोटो; नेटकऱ्यांनी धरलं धारेवर

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number