Arjun Tendulkar Wedding: क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर यांच्या घरी सध्या आनंदाचे उधाण आले आहे. सचिन तेंडुलकर यांचे सुपुत्र आणि क्रिकेटपटू अर्जुन तेंडुलकर गुरुवारी सानिया चंडोक हिच्यासोबत विवाहबंधनात अडकला. लोअर परेल येथील अतिशय आलिशान अशा ‘द सेंट रेजिस’ हॉटेलमध्ये हा शाही विवाहसोहळा अत्यंत थाटामाटात पार पडला. या सोहळ्याला खेळ, राजकारण, मनोरंजन आणि उद्योग जगतातील नामवंतांनी हजेरी लावत नवदाम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
क्रिकेट विश्वातील ताऱ्यांची मांदियाळी
मैदानावर प्रतिस्पर्ध्यांना घाम फोडणारे दिग्गज खेळाडू अर्जुनच्या लग्नात एकत्र दिसले. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एम एस धोनी पत्नी साक्षीसह या सोहळ्यात सहभागी झाला होता. त्यांच्यासोबतच माजी अष्टपैलू युवराज सिंग आणि हेझल कीच यांनीही उपस्थिती लावली. तसेच हरभजन सिंह-गीता बसरा आणि झहीर खान-सागरिका घाटगे या जोड्यांनीही या सोहळ्याची शोभा वाढवली.
Arjun Tendulkar, the son of Sachin Tendulkar, got married to Saaniya Chandhok today in Mumbai.❤️ Congratulations to Arjun and Saaniya. Best wishes for a happy life together. ? pic.twitter.com/HhkU9is64F — ???????⁴⁵ (@rushiii_12) March 5, 2026
अंबानी कुटुंबासह उद्योजकांची उपस्थिती
देशातील नामवंत उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी आपला मुलगा आकाश आणि सून श्लोका यांच्यासह या लग्नाला हजेरी लावली. अंबानी कुटुंबाने तेंडुलकर परिवाराशी संवाद साधत अर्जुन आणि सानियाला भावी आयुष्यासाठी आशीर्वाद दिले.
VIDEO | Mumbai, Maharashtra: Reliance Industries Chairman Mukesh Ambani, his wife and Reliance Foundation Chairperson Nita Ambani, their son Akash Ambani and his wife Shloka Ambani arrive for the wedding of cricket legend Sachin Tendulkar's son Arjun Tendulkar with Saaniya… pic.twitter.com/We1G7qGoJG — Press Trust of India (@PTI_News) March 5, 2026
राजकीय नेत्यांची मांदियाळी
महाराष्ट्राच्या राजकारणातील बड्या नेत्यांनीही या सोहळ्याला हजेरी लावली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे सहकुटुंब या विवाहसोहळ्यात सहभागी झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, खासदार सुप्रिया सुळे आणि भाजप नेते आशिष शेलार यांनीही नवविवाहित जोडप्याची भेट घेतली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.
#WATCH | Mumbai: MNS chief Raj Thackeray, along with his family, arrives to attend the wedding ceremony of Arjun Tendulkar and Saaniya Chandhok pic.twitter.com/xaLgdmPdmx — ANI (@ANI) March 5, 2026
बॉलिवूडचा ‘ग्लेमरस’ तडका
तेंडुलकरांच्या या सोहळ्याला बॉलिवूडचा तडकाही तितकाच जबरदस्त होता. किंग खान शाहरुख खान आपली पत्नी गौरी आणि मुलगी सुहानासह पारंपरिक वेषात दाखल झाला. महानायक अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनीही हजेरी लावली, मात्र त्यांनी थेट हॉलमध्ये प्रवेश करणे पसंत केले. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनी कॅमेऱ्यासमोर आनंदाने पोझ दिल्या. याशिवाय अभिनेता फरहान अख्तर आणि गोविंदाची भाची आरती सिंह ही देखील पती दीपक चौहानसोबत या सोहळ्यात दिसली.
हेही वाचा – Lara Dutta: अभिनेत्री लारा दत्ता मुलीसह दुबईत अडकली; व्हिडीओ शेअर करत सांगितला थरार
सोशल मीडियावर प्री-वेडिंगची चर्चा
लग्नाआधी पार पडलेल्या संगीत आणि मेहंदी सोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. जवळचे मित्र आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमांमधील अर्जुन आणि सानियाचा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.