Hardik Pandya New Car: हार्दिक पांड्याच्या ताफ्यात आणखी एक लक्झरी कार; फेरारीनंतर खरेदी केली ‘ही’ महागडी कार

अवघ्या काही दिवसांपूर्वी 12 कोटींची फेरारी खरेदी केल्यानंतर, हार्दिकच्या कार संग्रहात आता आणखी एका महागड्या वाहनाची भर पडली आहे.

Hardik Pandya New Car: हार्दिक पांड्याच्या ताफ्यात आणखी एक लक्झरी कार; फेरारीनंतर खरेदी केली ‘ही’ महागडी कार

Hardik Pandya New Car: भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू आणि आयपीएलमधील मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या सध्या त्याच्या खेळासोबतच आलिशान जीवनशैलीमुळे चर्चेत आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वी 12 कोटींची फेरारी खरेदी केल्यानंतर, हार्दिकच्या कार संग्रहात आता आणखी एका महागड्या वाहनाची भर पडली आहे. त्याने 'मर्सिडीज-बेंझ व्ही-क्लास' (Mercedes-Benz V-Class) ही आलिशान कार खरेदी केली असून, याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

गर्लफ्रेंड महिका शर्मासोबत स्वीकारल्या कारच्या चाव्या
'Auto Hangar' या इन्स्टाग्राम पेजने शेअर केलेल्या फोटोंमध्ये हार्दिक पांड्या आपली गर्लफ्रेंड महिका शर्मा हिच्यासोबत या नवीन कारच्या चाव्या स्वीकारताना दिसत आहे. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "भारतातील पहिली मर्सिडीज-बेंझ व्ही-क्लास हार्दिक आणि महिका यांच्या स्वाधीन करताना आम्हाला अभिमान वाटत आहे." विशेष म्हणजे, हार्दिकने ही कार महिकाला भेट दिली असावी, असा अंदाज चाहत्यांकडून वर्तवला जात आहे. या महिन्याच्या सुरुवातीला जेव्हा हार्दिकने फेरारी घेतली होती, तेव्हाही महिकाने त्या कारची पूजा केली होती.

मर्सिडीज-बेंझ व्ही-क्लासची किंमत आणि वैशिष्ट्ये
हार्दिकने खरेदी केलेल्या या मर्सिडीज-बेंझ मॉडेलची भारतातील एक्स-शोरूम किंमत 1.40 कोटी रुपये आहे, तर ऑन-रोड किंमत सुमारे 1.60 कोटी रुपयांपर्यंत जाते. हे एक अत्यंत प्रगत आणि आलिशान वाहन असून ते डिझेल (V 300) आणि पेट्रोल हायब्रिड अशा दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. आपल्या लक्झरी इंटिरिअर आणि आरामदायी प्रवासासाठी ही कार ओळखली जाते.

हेही वाचा – IPL 2026 MI vs KKR : 14 वर्षांचा 'तो' इतिहास बदलण्यासाठी MI सज्ज; घरच्या मैदानावर केकेआरची धुलाई करणार?

हार्दिकची कमाई
हार्दिक पांड्या सध्या आयपीएल 2026 हंगामासाठी सज्ज झाला आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून तो आज कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करत आहे. हार्दिकची आयपीएलमधील फी 16.35 कोटी रुपये इतकी असून, याव्यतिरिक्त त्याला बीसीसीआयचा केंद्रीय करार आणि विविध ब्रँड्सच्या जाहिरातींमधून कोट्यवधींचे उत्पन्न मिळते. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स या हंगामात कशी कामगिरी करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number