Air India Express: लँडिंगवेळी एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाचं चाक निखळलं; 133 प्रवाशांचा…

एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाचे लँडिंग होत असताना अचानक पुढचे चाक (Nose Wheel) निखळल्याने विमानाला भीषण झटका बसला.

Air India Express: लँडिंगवेळी एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाचं चाक निखळलं; 133 प्रवाशांचा…

Air India Express: हैदराबादहून पर्यटनासाठी आनंदाने निघालेल्या 133 प्रवाशांसाठी आजचा प्रवास काळजाचा थरकाप उडवणारा ठरला. एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाचे लँडिंग होत असताना अचानक पुढचे चाक (Nose Wheel) निखळल्याने विमानाला भीषण झटका बसला. सुदैवाने, वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला असून सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.

धावपट्टीवर लँडिंगवेळी तांत्रिक बिघाड
बुधवारी सकाळी 6:42 वाजता एअर इंडिया एक्सप्रेसचे 'फ्लाइट क्रमांक IX 938' हैदराबादवरून फुकेतकडे झेपावले होते. सर्व काही सुरळीत असताना, सकाळी 11:40 च्या सुमारास जेव्हा विमान फुकेत आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीला स्पर्श करत होते, तेव्हाच तांत्रिक बिघाड झाला. विमानाचे पुढचे चाक निकामी झाल्याने विमानाने जोरात हिसका दिला. विमानात धूर दिसू लागल्याने प्रवाशांमध्ये एका क्षणात 'सगळं संपलं' अशी भीती निर्माण झाली होती, मात्र सुदैवाने जीवितहानी टळली.

फुकेत विमानतळ ठप्प; अनेक उड्डाणे वळवली
विमानाचा अत्यंत महत्त्वाचा भाग असलेला 'नोज व्हील' निकामी झाल्यामुळे विमान धावपट्टीच्या बरोबर मध्यभागी अडकून पडले. यामुळे फुकेत विमानतळावरील सर्व उड्डाणे तातडीने थांबवण्यात आली आहेत. धावपट्टी अडकल्यामुळे इतर आंतरराष्ट्रीय विमानांना दुसऱ्या विमानतळांकडे वळवण्यात आले असून, रनवे रिकामा होईपर्यंत येथील विमान वाहतूक विस्कळीत राहणार आहे.

हेही वाचा – India Middle East flights: एअर इंडिया आणि इंडिगोकडून विशेष विमानांची घोषणा! प्रवाशांच्या सुटकेसाठी भारतीय कंपन्या सज्ज; पाहा संपूर्ण यादी

एअर इंडिया एक्सप्रेसचे अधिकृत स्पष्टीकरण
या घटनेनंतर एअर इंडिया एक्सप्रेसने अधिकृत पत्रक प्रसिद्ध केले आहे. "विमानातील कर्मचाऱ्यांनी सर्व सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन केले असून, प्रवाशांना कोणतीही इजा होऊ न देता सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे," असे कंपनीने म्हटले आहे. हे विमान Boeing 737-MAX 8 मॉडेलचे होते. तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांना काही काळ मनस्ताप सहन करावा लागला असला, तरी सर्व प्रवाशांची सुटका सुखरूप झाली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number