यूएस ओपनवर जोकोविचचेच अधिराज्य! मेदवेदेवला पछाडत जिंकले २४ वे ग्रँडस्लॅम

सर्बियन टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने अंतिम फेरीत डॅनिल मेदवेदेवचा पराभव करून चौथ्यांदा यूएस ओपन पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले. जोकोविचचे हे विक्रमी २४ वे ग्रँडस्लॅम जेतेपद आहे. जोकोविचने यापूर्वी २०११, २०१५ आणि २०१८ मध्ये यूएस ओपनचे विजेतेपद पटकावले आहे. जोकोविचने पहिला सेट ६-३ असा सहज जिंकला. पुढच्या सेटमध्ये मेदवेदेवने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. पण टायब्रेकरमध्ये जोकोविचने आपली […]

यूएस ओपनवर जोकोविचचेच अधिराज्य! मेदवेदेवला पछाडत जिंकले २४ वे ग्रँडस्लॅम

सर्बियन टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने अंतिम फेरीत डॅनिल मेदवेदेवचा पराभव करून चौथ्यांदा यूएस ओपन पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले. जोकोविचचे हे विक्रमी २४ वे ग्रँडस्लॅम जेतेपद आहे. जोकोविचने यापूर्वी २०११, २०१५ आणि २०१८ मध्ये यूएस ओपनचे विजेतेपद पटकावले आहे.

जोकोविचने पहिला सेट ६-३ असा सहज जिंकला. पुढच्या सेटमध्ये मेदवेदेवने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. पण टायब्रेकरमध्ये जोकोविचने आपली ताकद दाखवली आणि हा सेटही ७-६(५) ने जिंकला. यानंतर तिसऱ्या सेटमध्ये जोकोविच पूर्ण फॉर्ममध्ये दिसला आणि त्याने मेदवेदेववर वर्चस्व राखले आणि तिसरा सेट ६-३ असा जिंकून यूएस ओपन चॅम्पियन बनला.

नोव्हाक जोकोविचला २०२१ च्या यूएस ओपनच्या अंतिम फेरीत मेदवेदेवकडून पराभव स्वीकारावा लागला होता आणि आता त्याने या पराभवाचा बदला घेतला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number