YouTube मध्ये आता WhatsApp सारखी सुविधा; व्हिडीओ शेअरिंगसाठी आले खास मेसेजिंग फीचर; पाहा कसं काम करतं

या फीचरमुळे वापरकर्त्यांना व्हिडिओ शेअर करण्यासाठी आता वारंवार दुसऱ्या मेसेजिंग ॲपचा आधार घेण्याची गरज उरणार नाही.

YouTube मध्ये आता WhatsApp सारखी सुविधा; व्हिडीओ शेअरिंगसाठी आले खास मेसेजिंग फीचर; पाहा कसं काम करतं

YouTube New Messaging Feature: जगातील सर्वात मोठे व्हिडिओ प्लॅटफॉर्म असलेले YouTube आपल्या वापरकर्त्यांसाठी एक अत्यंत उपयुक्त आणि मनोरंजक सुविधा घेऊन आले आहे. आता वापरकर्त्यांना YouTube ॲपच्या आतच एकमेकांना मेसेज पाठवता येणार आहेत. या फीचरमुळे वापरकर्त्यांना व्हिडिओ शेअर करण्यासाठी आता वारंवार दुसऱ्या मेसेजिंग ॲपचा आधार घेण्याची गरज उरणार नाही. विशेष म्हणजे, अशा प्रकारचे फीचर YouTube ने पूर्वीही आणले होते, परंतु काही कारणास्तव ते बंद करण्यात आले होते. आता हेच फीचर अधिक प्रगत स्वरूपात पुन्हा सादर केले जात आहे.

व्हिडिओ शेअरिंगची कटकट संपणार
पूर्वी एखाद्याला YouTube व्हिडिओ पाठवायचा असल्यास, प्रथम त्या व्हिडिओची लिंक कॉपी करून ती WhatsApp किंवा इतर मेसेजिंग ॲपमध्ये पेस्ट करावी लागत असे. ही प्रक्रिया थोडी वेळखाऊ आणि त्रासदायक होती. मात्र, या नवीन मेसेजिंग फीचरमुळे वापरकर्ते थेट प्लॅटफॉर्मवरूनच मेसेज आणि व्हिडिओ शेअर करू शकतील. यामुळे व्हिडिओ शेअरिंगची प्रक्रिया जलद आणि सोपी होणार असून वापरकर्त्यांना ॲप सोडून बाहेर जाण्याची गरज भासणार नाही.

फीचर वापरण्यासाठीच्या अटी आणि नियम
YouTube ने हे फीचर वापरण्यासाठी काही ठराविक नियम लागू केले आहेत:

साइन-इन अनिवार्य: या सुविधेचा लाभ घेण्यासाठी वापरकर्त्याने आपल्या YouTube खात्यात लॉगिन करणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा: हे फीचर वापरण्यासाठी वापरकर्त्याचे वय किमान 18 वर्षे असणे बंधनकारक आहे.
कंट्रोल ऑप्शन्स: मेसेज पाठवणाऱ्याला तो 'अनसेंड' (रद्द) करण्याचा पर्याय असेल, तर मेसेज प्राप्त करणाऱ्याला तो स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार असेल.

हेही वाचा – Whatsapp New Feature: स्टिकर शोधण्याची कटकट संपली; इमोजी टाईप करताच व्हॉट्सअ‍ॅप सुचवणार योग्य स्टिकर, जाणून घ्या नवीन अपडेट

युरोपमध्ये रोलआउट सुरू; भारतीय वापरकर्त्यांची प्रतीक्षा

YouTube ने या सुविधेचे रोलआउट सुरुवातीला पोलंड आणि आयर्लंडमध्ये केले होते. आता हे फीचर ऑस्ट्रिया, जर्मनी, फ्रान्स, इटली आणि स्वित्झर्लंडसह अनेक युरोपीय देशांमध्ये उपलब्ध करून दिले जात आहे. मात्र, भारतीय वापरकर्त्यांसाठी हे फीचर कधी लाँच होणार, याबाबत कंपनीने अद्याप कोणतीही अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. युरोपीय देशांमधील वापरकर्त्यांचा प्रतिसाद पाहून लवकरच हे फीचर भारतातही लाँच होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number