Avinash Abhyankar: ‘स्वतःला बाळासाहेबांचे सैनिक म्हणवता मग मराठी सक्तीला उशीर का?’ मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांचा प्रताप सरनाईकांना सवाल

अविनाश अभ्यंकर यांनी रिक्षा-टॅक्सी चालकांच्या वर्तणुकीवरही बोट ठेवले. ते म्हणाले, &quotतुमच्याच राज्यात तुम्हाला विचारले जाते की तुम्ही कोण?

Avinash Abhyankar: ‘स्वतःला बाळासाहेबांचे सैनिक म्हणवता मग मराठी सक्तीला उशीर का?’ मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांचा प्रताप सरनाईकांना सवाल

Avinash Abhyankar:  रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या संदर्भात आज विविध संघटनांसोबत झालेल्या बैठकीनंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “महाराष्ट्रात रिक्षा किंवा टॅक्सी चालवायची असेल, तर मराठी भाषा यायलाच हवी,” असे ठाम प्रतिपादन त्यांनी केले आहे. या निर्णयाबाबत उद्या अंतिम घोषणा होण्याची शक्यता असून, परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांशीही यावर सविस्तर चर्चा केली जाणार आहे.

सकारात्मक चर्चा, उद्या होणार अंतिम निर्णय
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “वेगवेगळ्या संघटनांच्या प्रतिनिधींसोबत आज सकारात्मक चर्चा झाली आहे. मला अभिमान आहे की, परिवहन मंत्री म्हणून मी ही भूमिका घेतली आहे की महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी अनिवार्य असलीच पाहिजे. या भूमिकेला सर्व संघटनांनी सहमती दर्शवली आहे.” मराठी भाषेच्या सक्तीबाबतचा ठोस निर्णय उद्या घेतला जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

‘मराठीला गृहीत धरू नका’; मनसेचा सरकारवर प्रहार
दुसरीकडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले आहे. मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी आक्रमक प्रतिक्रिया देताना म्हटले की, “स्वतःला बाळासाहेबांचे सैनिक म्हणवणता मग मराठी सक्तीला उशीर का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. जर आज बाळासाहेब असते, तर त्यांना हे निर्णय मान्य झाले असते का? आम्ही कायद्यानेच मराठीची मागणी करत आहोत. मराठी माणूस आणि संस्कृतीला सर्वांनी गृहीत धरले आहे कारण आम्ही शांत आहोत. पण आता आम्ही शांत बसणार नाही.”

हेही वाचा – Eknath Shinde : एकनाथ शिंदे विधान परिषद निवडणुकीत आणणार नवा ट्विस्ट, भाजपचं बिनविरोधाचं स्वप्न भंगणार?; शिंदेंचा ‘प्लॅन बी’ काय?

परप्रांतीय चालकांच्या मुजोरीवर संताप
अविनाश अभ्यंकर यांनी रिक्षा-टॅक्सी चालकांच्या वर्तणुकीवरही बोट ठेवले. ते म्हणाले, “तुमच्याच राज्यात तुम्हाला विचारले जाते की तुम्ही कोण? आम्ही तुमची भाषा बोलणार नाही, अशी उद्धट भाषा वापरली जाते. बिल किती झाले किंवा कुठे जायचे आहे, हे विचारल्यावरही नीट उत्तर मिळत नाही. अशा प्रकारची मुजोरी आता सहन केली जाणार नाही.” मराठी भाषेच्या या अनिवार्यतेवरून आता सरकार आणि मनसे आमनेसामने आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number