Beed Nagarpalika Election: बीडमध्ये अजित पवार गटाला मोठा धक्का! योगेश क्षीरसागर यांनी धरली भाजपची वाट

राष्ट्रवादी नेते आणि शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे बंधू योगेश क्षीरसागर यांनी पक्षत्याग करून भाजपची वाट धरली आहे.

Beed Nagarpalika Election: बीडमध्ये अजित पवार गटाला मोठा धक्का! योगेश क्षीरसागर यांनी धरली भाजपची वाट

Beed Nagarpalika Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर  जिल्ह्यातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला बीडमध्ये मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी नेते आणि शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे बंधू योगेश क्षीरसागर यांनी पक्षत्याग करून भाजपची वाट धरली आहे. पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत त्यांचा भाजप पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. आता ते थेट भाजपच्या कमळ चिन्हावरून बीड नगरपालिकेची निवडणूक रिंगणात उतरतील, अशी अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

आता मोकळा श्वास घेतोय – योगेश क्षीरसागर

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर बोलताना योगेश क्षीरसागर म्हणाले की, “राष्ट्रवादीत राहून अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. पक्षात माझ्या कामाला योग्य स्थान मिळालं नाही, त्यामुळे आता भाजपमध्ये प्रवेश करून मुक्त वाटतंय.” त्यांच्या या निर्णयामुळे निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

हेही वाचा – Jitendra Awhad : आव्हाड-शेलारांमध्ये जुंपली; 'गर्वाचे घर नेहमी खाली होतं', म्हणत आव्हाडांचा शेलारांवर पलटवार 

नगरपालिका निवडणूक लढवणार  

दरम्यान, सोमवारी नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने क्षीरसागरांनी भाजप उमेदवार म्हणून तयारी सुरू केली. त्यांचे वडील डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी बीड नगरपालिकेवर अनेक वर्षे वर्चस्व गाजवले आहे. त्यामुळे या प्रवेशाला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. योगेश क्षीरसागर यांनी म्हटलं आहे की, पंकजा मुंडे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. बीड नगरपरिषदेची जागा महिलांसाठी राखीव असल्याने, आम्ही कमळ चिन्हावरून निवडणूक लढणार आहोत. भाजप आणि आमचे सर्व कार्यकर्ते एकजुटीने काम करतील. 

हेही वाचा – Raja Rammohun Roy Controversy : भाजप मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणे, 'राजा राम मोहन रॉय ब्रिटिशांचे एजंट…'

तथापी, राष्ट्रवादी सोडण्यामागील कारणांबद्दल बोलताना क्षीरसागर म्हणाले की, 'मी पक्षात प्रामाणिकपणे काम केले, पण तरीही विनाकारण विरोध सहन करावा लागला. पदाधिकारी नियुक्त्यांमध्ये मला कधीच विश्वासात घेण्यात आले नाही.' अजित पवार यांनी बीड नगरपरिषदेची जबाबदारी गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांच्याकडे दिल्याने त्यांची नाराजी शिगेला पोहोचली.  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number