Year Ender 2025: या स्टार्टअप्ससाठी ‘बॅड न्यूज’! निधीअभावी ‘या’ 4 मोठ्या भारतीय कंपन्यांनी गाशा गुंडाळला

एकीकडे नवीन संकल्पनांनी बाजारपेठेत प्रवेश केला, तर दुसरीकडे निधीची कमतरता आणि वाढत्या स्पर्धेमुळे अनेक दिग्गज स्टार्टअप्सना आपला गाशा गुंडाळावा लागला.

Year Ender 2025:  या स्टार्टअप्ससाठी ‘बॅड न्यूज’! निधीअभावी ‘या’ 4 मोठ्या भारतीय कंपन्यांनी गाशा गुंडाळला

Big Indian Startups Shut Down : भारतीय स्टार्टअप विश्वासाठी 2025 हे वर्ष अत्यंत आव्हानात्मक आणि चढ-उतारांचे ठरले. एकीकडे नवीन संकल्पनांनी बाजारपेठेत प्रवेश केला, तर दुसरीकडे निधीची कमतरता आणि वाढत्या स्पर्धेमुळे अनेक दिग्गज स्टार्टअप्सना आपला गाशा गुंडाळावा लागला. भांडवल उभारणीचे प्रयत्न अपयशी ठरल्याने काही नामांकित कंपन्यांना अखेर टाळे लागले.

1. Hike: मेसेजिंगपासून गेमिंगपर्यंतचा प्रवास थांबला
भारती मित्तल यांचे पुत्र केविन मित्तल यांनी 2012 मध्ये Hike ची सुरुवात मोठ्या थाटामाटात केली होती. व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामसारख्या जागतिक कंपन्यांना टक्कर देण्याची क्षमता या भारतीय ॲपमध्ये असल्याचे मानले जात होते. सुरुवातीच्या 4 वर्षांतच टायगर ग्लोबल आणि सॉफ्टबँकसारख्या कंपन्यांकडून हायकेला 25 कोटी डॉलर्सचा निधी मिळाला होता. मात्र, 2021 मध्ये वाढत्या स्पर्धेमुळे मेसेजिंग सेवा बंद करून कंपनीने गेमिंग क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले. अखेर सप्टेंबर 2025 मध्ये सरकारने 'रिअल मनी गेमिंग' ॲप्सवर पूर्ण बंदी घातल्याने हायकेला आपले पूर्णच काम कायमचे बंद करावे लागले.

2. Dunzo: हायपरलोकल डिलिव्हरीचा किंग पायउतार
भारतात हायपरलोकल डिलिव्हरी सेवा सुरू करणाऱ्या सुरुवातीच्या कंपन्यांमध्ये Dunzo चे नाव अग्रक्रमाने घेतले जात असे. 2022 मध्ये रिलायन्स रिटेलने या स्टार्टअपमध्ये 24 कोटी डॉलर्सची मोठी गुंतवणूक केली होती. मात्र, त्यानंतर झेप्टो (Zepto), स्विगी इंस्टामार्ट आणि ब्लिंकिट यांसारख्या कंपन्यांनी बाजारात झपाट्याने पकड मिळवली. या बलाढ्य स्पर्धकांसमोर तग धरू न शकल्याने 2025 मध्ये डंझोचा प्रवास अधिकृतपणे समाप्त झाला.

हेही वाचा – Warren Buffett Retirement : गुंतवणूक विश्वासाठी धक्कादायक बातमी! वॉरेन बफे 31 डिसेंबरला होणार निवृत्त; जाणून घ्या त्यांचा यशाचा मंत्र

3. Otipy: लॉकडाऊनमध्ये जन्मलेले स्टार्टअप झाले बंद
2020 मधील लॉकडाऊनच्या काळात Otipy या स्टार्टअपची सुरुवात झाली होती. ही कंपनी सबस्क्रिप्शन मॉडेलवर आधारित किराणा माल (Groceries) घरपोच देण्याचे काम करत असे. सुरुवातीला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला, परंतु पुढील वाटचालीसाठी आवश्यक असलेला निधी न मिळाल्याने 2025 मध्ये या कंपनीला आपली ऑपरेशन्स थांबवावे लागले.

4. BluSmart: आर्थिक अनियमितेचा फटका
ओला आणि उबरला पर्याय म्हणून 2019 मध्ये BluSmart ही कॅब सेवा सुरू झाली होती. पूर्णपणे इलेक्ट्रिक वाहने (EV) आणि पगारदार ड्रायव्हर ही या कंपनीची मुख्य वैशिष्ट्ये होती. मात्र, गेल्या काही काळापासून कंपनीमध्ये झालेल्या आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपांमुळे मोठे नुकसान झाले. परिणामी, यावर्षी कंपनीची सेवा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.

हेही वाचा – Year Ender 2025: सत्ता, संघर्ष आणि टॅरिफ वॉर…! 2025 मधील जगाला नव्याने आकार देणाऱ्या प्रमुख जागतिक घडामोडी

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number