Maharashtra Monsoon Session 2026 : ‘शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा…’; विरोधकांकडून पहिल्याच दिवशी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन

आंदोलन सुरू असतानाच सत्ताधारी पक्षाचे नेते आणि विरोधक आमनेसामने आल्यामुळे विधानभवन परिसरात काही काळ प्रचंड घोषणाबाजी आणि गदारोळ पाहायला मिळाला.

Maharashtra Monsoon Session 2026 : ‘शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा…’; विरोधकांकडून पहिल्याच दिवशी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन

Opposition Protest: राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी राजकीय वातावरण चांगलेच तापले. अधिवेशनाचे कामकाज सुरू होण्यापूर्वीच महाविकास आघाडीच्या (मविआ) नेत्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर एकत्र येत सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलन सुरू असतानाच सत्ताधारी पक्षाचे नेते आणि विरोधक आमनेसामने आल्यामुळे विधानभवन परिसरात काही काळ प्रचंड घोषणाबाजी आणि गदारोळ पाहायला मिळाला. पहिल्याच दिवशी झालेल्या या संघर्षामुळे हे अधिवेशन अत्यंत वादळी ठरणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

‘शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा’; कर्जमाफीवरून सरकारची कोंडी
या आंदोलनादरम्यान महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरले. राज्य सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी पूर्णपणे फसवी असून, ती केवळ कागदावरच असल्याचा आरोप विरोधकांनी केला. सरकारने शेतकऱ्यांना विविध अटी आणि शर्तींच्या जाळ्यात अडकवून ठेवले आहे, अशी टीका मविआ नेत्यांनी केली. “शेतकऱ्यांचा सातबारा पूर्णपणे कोरा करण्यात यावा आणि त्यांना खरी मदत देण्यात यावी,” अशी प्रमुख मागणी यावेळी आंदोलक नेत्यांनी लावून धरली.

हेही वाचा – MLA Aaditya Thackeray : ‘शिवसेना एकच…ती आमची…बाकी भाजपचे गुलाम!’; आदित्य ठाकरेंचा शिंदेंसह महायुतीवर घणाघात

राज्यातील गंभीर प्रश्नांकडे दुर्लक्ष; महाविकास आघाडीचा थेट आरोप

पत्रकार परिषदेत आणि आंदोलनादरम्यान महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी राज्यातील बिघडत चाललेल्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. राज्यात सध्या दुष्काळ, शेतकऱ्यांचे गंभीर प्रश्न, महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना, कोलमडलेली कायदा-सुव्यवस्था आणि अमली पदार्थांचे वाढते जाळे यांमुळे जनता त्रस्त आहे. मात्र, या अत्यंत संवेदनशील आणि गंभीर प्रश्नांकडे राज्य सरकारचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा थेट आरोप विरोधकांनी केला. या ज्वलंत मुद्द्यांवर सरकारकडे कोणतेही समाधानकारक उत्तर नसल्याची घणाघाती टीकाही मविआने केली.

राज्यात तातडीने ‘सुका दुष्काळ’ जाहीर करण्याची मागणी
राज्यातील शेती संकटावर बोलताना शिवसेनेचे गटनेते भास्कर जाधव यांनी सरकारच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला. “सध्या राज्यावर दुष्काळाचे मोठे संकट घोंगावत आहे. वेळेवर पाऊस न पडल्यामुळे पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत, परिणामी शेतकऱ्यांसमोरील अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत,” असे जाधव म्हणाले. या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन महायुती सरकारने राज्यात तातडीने ‘सुका दुष्काळ’ जाहीर करावा आणि बळीराजाला थेट दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी भास्कर जाधव यांनी पत्रकार परिषदेत केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number