Vasant More: वसंत मोरेंना होणार अटक? न्यायालयाने फेटाळला जामीन; काय आहे नेमंक प्रकरण? वाचा

काही दिवसांपूर्वी एका जाहीर पत्रकार परिषदेत केलेल्या विधानामुळे वसंत मोरे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.

Vasant More: वसंत मोरेंना होणार अटक? न्यायालयाने फेटाळला जामीन; काय आहे नेमंक प्रकरण? वाचा

Vasant More:  पुण्यातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आक्रमक नेते वसंत मोरे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यात पुणे जिल्हा न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. या निर्णयामुळे मोरेंना आता कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता निर्माण झाली असून, पुणे पोलीस आता काय पाऊल उचलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नेमकं प्रकरण काय?
काही दिवसांपूर्वी एका जाहीर पत्रकार परिषदेत केलेल्या विधानामुळे वसंत मोरे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष अविनाश लहाडे यांचे वडील विश्वनाथ लहाडे यांच्याबद्दल मोरेंनी आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी लहाडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (अ‍ॅट्रॉसिटी) गुन्हा नोंदवण्यात आला होता.

न्यायालयाने जामीन का नाकारला?
गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी वसंत मोरे यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद सविस्तर ऐकून घेतला. प्रकरणाचे गांभीर्य आणि पुराव्यांची प्राथमिक पडताळणी लक्षात घेऊन न्यायालयाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिला. जामीन अर्ज फेटाळल्या गेल्याने शिवाजीनगर पोलिसांना आता मोरेंना ताब्यात घेण्याचा कायदेशीर मार्ग मोकळा झाला आहे.

प्रकरणाची पार्श्वभूमी
ही संपूर्ण घटना 25 फेब्रुवारी रोजी पुणे महानगरपालिकेत घडली होती. एका पत्रकार परिषदेत बोलताना वसंत मोरे यांनी फिर्यादी विश्वनाथ लहाडे यांचा उल्लेख करत काही वादग्रस्त विधाने केली होती. ‘आपण अनुसूचित जातीचे आहोत हे माहित असूनही, वसंत मोरे यांनी जाणीवपूर्वक आणि सार्वजनिकरित्या आमचा अपमान केला. तसेच या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जाणीवपूर्वक व्हायरल केल्यामुळे आमची सामाजिक बदनामी झाली आणि कुटुंबाला मानसिक त्रास सहन करावा लागला,’ असं विश्वनाथ लहाडे यांनी म्हटलं होतं. 

हेही वाचा – Sanjay Gaikwad: ‘कार्यकर्त्यांसाठी 35 कोटी कमिशन सोडलं…’; संजय गायकवाडांचं खळबळजनक विधान; व्हिडीओ व्हायरल होताच केली सारवासारव

आता पुढे काय?
न्यायालयाच्या या निर्णयामुळे वसंत मोरे यांच्यासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. आता ते या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागतात की शिवाजीनगर पोलीस त्याआधीच त्यांना ताब्यात घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number