Sanjay Raut: उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जाणार? संजय राऊत म्हणाले, ‘योग्य वेळी पेढे मिळतील…’

उद्धव ठाकरे स्वतः विधान परिषदेच्या रिंगणात उतरणार का? या प्रश्नावर राऊतांनी सूचक उत्तर दिले आहे.

Sanjay Raut: उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जाणार? संजय राऊत म्हणाले, ‘योग्य वेळी पेढे मिळतील…’

Sanjay Raut: राज्याच्या राजकारणात सध्या विधान परिषदेच्या आगामी 10 जागांच्या निवडणुकीने वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर, शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. उद्धव ठाकरे स्वतः विधान परिषदेच्या रिंगणात उतरणार का? या प्रश्नावर राऊतांनी सूचक उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, “उद्धव ठाकरे आपली भूमिका योग्य वेळी स्पष्ट करतील. जेव्हा उमेदवारी अर्ज भरला जाईल, तेव्हा तुम्हाला नक्कीच निमंत्रित करू. तुम्हाला पेढे खायला मिळतील, पण आमचेच पेढे खाण्यासाठी तुम्ही इतके उत्सुक का आहात? सत्ताधारी पक्षांचेही पेढे खाऊन बघा.” या विधानातून त्यांनी उमेदवारीबाबतचे सस्पेन्स कायम ठेवले आहे. दरम्यान, यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. “हे मतदान गुप्त आहे आणि राजकारणात कोणी कोणाचे नसते,” असे म्हणत त्यांनी महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

एकनाथ शिंदेकडून भाजपची मतं फुटणार?
विधान परिषदेच्या निवडणुकीत होणाऱ्या संभाव्य घोडेबाजारावर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले की, “एकनाथ शिंदे हे आता इतके ‘शक्तिशाली’ झाले आहेत की, ते देवेंद्र फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी भाजपची मतेही फोडू शकतात. ही निवडणूक गुप्त मतदानाची असल्याने प्रत्येकाने आपापली मते सांभाळून ठेवावीत, कारण इथे सर्व व्यवहाराचा खेळ आहे.” राऊत यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

हेही वाचा – Husain Dalwai: ‘हिंदूही दहशदवादी असू शकतो’; दहशदवादाविरोधात हुसेन दलवाईं यांचे खळबळजनक वक्तव्य, बागेश्वर बाबांचाही घेतला समाचार
 
महत्त्वाच्या घडामोडी आणि निवडणुकीचे वेळापत्रक
वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची गुप्त भेट झाल्याच्या वावड्यांवर राऊतांनी पूर्णविराम दिला आहे. “ज्यांनी हा दावा केला, त्यांनीच खुलासा केला आहे, त्यामुळे उद्धव ठाकरेंनी त्यावर बोलण्याची गरज नाही,” असे त्यांनी ठणकावून सांगितले. विधान परिषदेसाठी 12 मे रोजी मतदान होणार असून, 30 एप्रिल ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांची घोषणा अद्याप झालेली नाही.

निवडणूक वेळापत्रक  

एकूण जागा: 10 जागा
अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख: 30 एप्रिल 2026
मतदान दिनांक: 12 मे 2026

राजकीय वर्तुळात आता सर्वांचे लक्ष 30 एप्रिलकडे लागले आहे, या दिवशी उमेदवारांच्या नावावरून पडदा उठणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number