Amruta Fadnavis: ‘यामुळे स्त्रियांचं वाईट होणार आहे का?’; ‘नारी शक्ती वंदन’ अधिनियमावरून अमृता फडणवीस यांचा विरोधकांना सवाल

स्त्रियांचा जो हक्क खूप आधीपासून डावलला गेला आहे, तो त्यांना आता मिळालाच पाहिजे, अशा शब्दांत अमृता फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

Amruta Fadnavis: ‘यामुळे स्त्रियांचं वाईट होणार आहे का?’; ‘नारी शक्ती वंदन’ अधिनियमावरून अमृता फडणवीस यांचा विरोधकांना सवाल

Amruta Fadnavis: देशातील महिलांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने पाऊल उचलले असतानाच, अमृता फडणवीस यांनी ‘नारी शक्ती वंदन’ अधिनियमाचे जोरदार समर्थन केले आहे. “स्त्रियांचा जो हक्क खूप आधीपासून डावलला गेला आहे, तो त्यांना आता मिळालाच पाहिजे,” अशा शब्दांत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच, या विधेयकावरून राजकारण करणाऱ्या विरोधकांचाही त्यांनी समाचार घेतला आहे.

पंतप्रधान मोदींचा संकल्प पूर्ण होणार
अमृता फडणवीस म्हणाल्या की, “नारी शक्ती वंदन अधिनियम हा केवळ स्त्रियांचीच नाही, तर प्रगत विचारांच्या पुरुषांचीही इच्छा आहे की तो पारित व्हावा. ही एक खूप मोठी गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे करून दाखवलं. मोदीजी या विषयात अत्यंत भक्कम आहेत आणि त्यांच्या मागे देशातील सर्व महिला शक्ती उभी आहे.” काही लोक केवळ ‘क्रेडिट’ घेण्यासाठी किंवा मोदीजी हे करू शकत नाहीत असे सांगून अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र मोदीजींनी आपला शब्द पूर्ण करून दाखवला आहे, असेही त्यांनी नमूद केले.

राजकीय स्वार्थाच्या आरोपांना प्रत्युत्तर
हे विधेयक आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणले गेल्याच्या आरोपांवर बोलताना अमृता फडणवीस यांनी विरोधकांना खडेबोल सुनावले. त्या म्हणाल्या, “या विधेयकामुळे स्त्रियांचे काही वाईट होणार आहे का? उलट यामुळे महिलांचे सक्षमीकरणच होणार आहे. 2023 मध्ये जेव्हा नवीन संसद भवन बनले, तेव्हापासूनच यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. यातील काही तांत्रिक पेच आता दूर करण्यात आले आहेत, त्यामुळे हे विधेयक अत्यंत सुलभपणेपास व्हायला हवे.”

हेही वाचा – Rahul Gandhi on PM Narendra Modi: सभागृहातील चर्चेदरम्यान राहुल गांधींनी केला पंतप्रधानांचा अपमान, ‘त्या’ एका शब्दामुळे आली माफी मागण्याची वेळ

महिला सक्षमीकरणासाठी ऐतिहासिक पाऊल
महिलांना आरक्षण आणि त्यांचे अधिकार मिळवून देणे हे काळाची गरज असल्याचे सांगत त्यांनी या अधिनियमाचे स्वागत केले. “स्त्रियांना त्यांचे हक्क मिळण्यासाठी आता आणखी प्रतीक्षा करण्याची गरज नाही,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राजकीय स्वार्थ बघण्यापेक्षा महिलांच्या हिताचा विचार करून सर्व पक्षांनी याला पाठिंबा द्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number