Rohit Pawar On NCP Merger: राष्ट्रवादीचे दोन गट पुन्हा एकत्र येणार? तटकरे-पटेलांची शरद पवारांसोबतची भेट अन् रोहित पवारांच्या ‘त्या’ विधानाने खळबळ

सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी नुकतीच शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या भेटीवर भाष्य करताना आमदार रोहित पवार यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली.

Rohit Pawar On NCP Merger: राष्ट्रवादीचे दोन गट पुन्हा एकत्र येणार? तटकरे-पटेलांची शरद पवारांसोबतची भेट अन् रोहित पवारांच्या ‘त्या’ विधानाने खळबळ

Rohit Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी नुकतीच शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या भेटीवर भाष्य करताना आमदार रोहित पवार यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली. “जर दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार असतील, तर मी संघर्षाचा मार्ग स्वीकारेल,” असे म्हणत त्यांनी आपली लढवय्या वृत्ती स्पष्ट केली.

पक्षात सर्व काही आलबेल नाही?
रोहित पवार म्हणाले की, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचे शरद पवारांशी अनेक वर्षांचे जुने ऋणानुबंध आहेत. मात्र, सद्यस्थितीत अजित पवारांच्या गटात ज्या काही घडामोडी सुरू आहेत, त्यावरून त्यांच्या पक्षात सर्व काही सुरळीत नसल्याचे दिसून येते. “पक्षाच्या विलीनीकरणाचा किंवा भविष्यातील वाटचालीचा निर्णय हा पूर्णपणे शरद पवारांचा असेल, पण मी एक कार्यकर्ता म्हणून संघर्षासाठी तयार आहे,” असे रोहित पवारांनी यावेळी ठणकावून सांगितले.

हेही वाचा – Internal Conflict in NCP: राष्ट्रवादीत मोठी उलथापालथ; सुनील तटकरेंचे पद धोक्यात? निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात बड्या नेत्यांच्या पदांना कात्री

महिला सुरक्षेवरून सरकारवर हल्लाबोल; महाराष्ट्र गुन्हेगारीत दुसऱ्या क्रमांकावर
राज्यातील वाढत्या महिला अत्याचाराच्या घटनांवरून रोहित पवारांनी सरकारला धारेवर धरले. NCRB च्या आकडेवारीचा दाखला देत त्यांनी महाराष्ट्रातील भीषण वास्तव मांडले. त्यांनी सांगितलं की, ‘गेल्या दोन वर्षांत राज्यातून 1 लाख 17 हजारांहून अधिक मुली बेपत्ता झाल्या असून, त्यापैकी 31 हजारांहून अधिक मुलींचा अद्याप पत्ता नाही. राज्यात दररोज सरासरी 136 आणि दर तासाला 6 महिलांविरोधी गुन्हे दाखल होत आहेत. राजधानी मुंबईत दररोज सरासरी ४ बलात्काराच्या घटनांची नोंद होत आहे.’ महिलांविरोधी गुन्ह्यांच्या बाबतीत उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे, ही राज्यासाठी शरमेची बाब असल्याचे ते म्हणाले.

‘शक्ती कायद्याची’ तातडीने अंमलबजावणी करा
महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी केवळ कायदे असून चालणार नाही, तर त्यांची कठोर अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याचे रोहित पवार यांनी नमूद केले. “शक्ती कायदा हा देशाला दिशा देणारा कायदा आहे. यामध्ये 30 दिवसांत आरोपपत्र आणि 30 दिवसांत सुनावणी पूर्ण करून शिक्षेची तरतूद आहे. साताऱ्यातील सासपडे येथील घटनेसारखे प्रकार थांबवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विशेष न्यायालयांची स्थापना करून या कायद्याची तातडीने अंमलबजावणी करावी,” अशी मागणी त्यांनी केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number