CM Letter To Amit Shah : अजित पवारांच्या अपघाताचे गूढ उकलणार? मुख्यमंत्री फडणवीसांचे अमित शाह यांना पत्र

विशेष म्हणजे, या पत्रात आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या शंकांचा आणि त्यांच्या पत्राचाही संदर्भ देण्यात आला आहे.<br/>

CM Letter To Amit Shah : अजित पवारांच्या अपघाताचे गूढ उकलणार? मुख्यमंत्री फडणवीसांचे अमित शाह यांना पत्र

CM Letter To Amit Shah : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघाताच्या चौकशीला आता वेग येण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची सीबीआय (CBI) चौकशी व्हावी, या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना अधिकृत पत्र पाठवले आहे. विशेष म्हणजे, या पत्रात आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या शंकांचा आणि त्यांच्या पत्राचाही संदर्भ देण्यात आला आहे.

पत्रातील महत्त्वाचे मुद्दे 
मुख्यमंत्री फडणवीस यांनी 6 मार्च रोजीच अमित शाह यांना पत्र लिहून या उच्चस्तरीय चौकशीची विनंती केली आहे. यापूर्वी रोहित पवार यांनी राज्य सरकारवर असा आरोप केला होता की, सरकारने अद्याप सीबीआय चौकशीसाठी केंद्राला पत्र पाठवलेले नाही. मात्र, आता मुख्यमंत्र्यांचे पत्र समोर आल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

हेही वाचा – Sushma Andhare : सुषमा अंधारेंचा रुपाली चाकणकरांवर हल्लाबोल; ‘त्या’ नराधम आरोपीला ‘राजाश्रय’ दिल्याचा खळबळजनक आरोप

दरम्यान, मुंबईहून बारामतीला जात असताना बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर विमानाचे नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाला होता, ज्यामध्ये अजित पवारांसह 5 जणांचा अंत झाला. अजित पवार यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number