BMC Election 2026 Exit Poll : गेल्या महिनाभरापासून सुरू असलेला मुंबईचा राजकीय रणसंग्राम गुरुवारी मतदानाने शांत झाला. मात्र, मतदान संपताच आलेल्या ‘एक्झिट पोल’च्या आकड्यांनी राजकीय वर्तुळात भूकंप घडवून आणला आहे. JVC च्या अंदाजानुसार, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महापालिकेवर तब्बल 25 वर्षांनंतर ‘महायुती’ आपला झेंडा फडकवण्याची शक्यता आहे. ठाकरे बंधू (उद्धव आणि राज ठाकरे) एकत्र येऊनही भाजपची लाट रोखण्यात अपयशी ठरण्याची शक्यता या पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे.
JVC एक्झिट पोलची आकडेवारी
मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांसाठी झालेल्या मतदानानंतर JVC ने जाहीर केलेल्या एक्झिट पोलनुसार, मुंबईत महायुती (भाजप आणि शिवसेना शिंदे गट) विजयाचा मोठा झेंडा फडकवताना दिसत आहे. या सर्वेक्षणातील अंदाजानुसार, महायुतीला तब्बल 137 ते 151 जागा मिळण्याची शक्यता आहे, जी बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 114 च्या आकड्यापेक्षा खूप जास्त आहे. दुसरीकडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांची युती दुसऱ्या क्रमांकावर राहण्याचा अंदाज आहे. या युतीला 59 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हेही वाचा – Maharashtra Civic Body Elections 2026 : दुपारनंतर मतदारांचा उत्साह वाढला; पहा जिल्हानिहाय मतदानाची आकडेवारी
तथापी, काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांना या निवडणुकीत फारसा प्रभाव पाडता आलेला दिसत नाही. त्यांना केवळ 14 टक्के मते आणि 23 जागा मिळण्याचा अंदाज आहे. उर्वरित 06 जागा आणि 7 टक्के मते इतर छोटे पक्ष किंवा अपक्ष उमेदवारांच्या पदरात पडण्याची शक्यता आहे. या आकड्यांवरून असे स्पष्ट होत आहे की, मुंबईत सलग 25 वर्षे सत्तेत असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेला यंदा मोठा धक्का बसू शकतो. तसेच मुंबईत महायुती ऐतिहासिक सत्तापालट करण्याच्या उंबरठ्यावर आहे. हा केवळ एक्झिट पोलचा अंदाज असला, तरी उद्याच्या अधिकृत निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
सत्तेचे समीकरण; 114 ची मॅजिक फिगर
मुंबईत सत्ता स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला किंवा युतीला 114 नगरसेवकांचे संख्याबळ आवश्यक आहे. एक्झिट पोलनुसार महायुती हा आकडा सहज पार करताना दिसत आहे. 2017 मध्ये भाजप 82 आणि शिवसेनेने 84 जागा जिंकल्या होत्या, मात्र यंदा भाजपने शिंदे गटासोबत युती केली आहे.
मुंबई मनपा एक्झिट पोल: निकालाचा कल
मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांसाठी झालेल्या मतदानानंतर जेव्हीसी, अॅक्सिस माय इंडिया, डीव्ही रिसर्च आणि जनमत यांसारख्या प्रमुख संस्थांचे एक्झिट पोल्स समोर आले आहेत. मुंबईत बहुमतासाठी 114 हा आकडा गाठणे आवश्यक असून, बहुतांश सर्वच कलानुसार महायुती (भाजप + शिवसेना शिंदे गट) सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने कूच करताना दिसत आहे. या एक्झिट पोल्सनी ठाकरे बंधूंच्या युतीला मोठा धक्का बसण्याचा अंदाज वर्तवला आहे.
1 डीव्ही रिसर्च (DV Research)
महायुती (BJP-SHS): 107 ते 122 जागा
ठाकरे बंधू युती: 68 ते 83 जागा
JDS Exit Poll for Thane Municipal Corporation (131 seats) are here ?️⚡#Thane #MunicipalPolls @jubilant_studio pic.twitter.com/aeoDVMAcfK — Jubilant Data Studio (@jubilant_studio) January 15, 2026
2. अॅक्सिस माय इंडिया (Axis My India)
महायुती (BJP-SHS): 131 ते 151 जागा
ठाकरे बंधू युती: 58 ते 68 जागा
काँग्रेस: 12 ते 16 जागा
BMC – Exit Poll – Seat Share – Vote Share (%)#BMCElections2026#ExitPoll2026#AxisMyIndia pic.twitter.com/xE535uMm3B — Axis My India (@AxisMyIndia) January 15, 2026
3. पोल्स ऑफ पोल्स (Poll of Polls – सरासरी अंदाज)
भाजपा-सेना (Mahayuti): 107 ते 122 जागा
ठाकरे बंधू युती: 68 ते 83 जागा
काँग्रेस व वंचित: 11 ते 25 जागा
इतर (Others): 08 ते 15 जागा
4. जनमत (Janmat Polls)
भाजपा-सेना (Mahayuti): 138 जागा
ठाकरे बंधू युती: 62 जागा
काँग्रेस-वंचित: 20 जागा
इतर (Others): 07 जागा
‘ठाकरे’ ब्रँड आणि मराठी मतांचे गणित
या निवडणुकीत तब्बल 20 वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच युतीत (मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर) लढले. या युतीचा फायदा ठाकरे गटाला झाला असला तरी, भाजपच्या सूक्ष्म नियोजनासमोर ही संख्या विजयासाठी पुरेशी ठरताना दिसत नाही. 61 वर्षांवरील मतदारांनी ठाकरेंना पसंती दिली असली, तरी तरुण मतदारांचा ओघ भाजपकडे झुकल्याचे या सर्वेक्षणात म्हटले आहे.