Ashok Kharat Case: ‘भोंदू खरातचा एन्काऊंटर होणार?’; खासदार प्रणिती शिंदेंच्या दाव्याने खळबळ

अशोक खरात याच्या भोवती चौकशीचा फास आवळला जात असतानाच, आता सोलापूरच्या काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी एक खळबळजनक शक्यता वर्तवली आहे.

Ashok Kharat Case: ‘भोंदू खरातचा एन्काऊंटर होणार?’; खासदार प्रणिती शिंदेंच्या दाव्याने खळबळ

Ashok Kharat Case: नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याच्या भोवती चौकशीचा फास आवळला जात असतानाच, आता सोलापूरच्या काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी एक खळबळजनक शक्यता वर्तवली आहे. “अशोक खरातचा एन्काऊंटर केला जाऊ शकतो,” असे धक्कादायक वक्तव्य त्यांनी केले असून, यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सत्ताधारी नेत्यांची काळी कृत्ये बाहेर येण्याच्या भीतीनेच हे पाऊल उचलले जाऊ शकते, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे. 

ED च्या छापेमारीनंतर खरातच्या अडचणीत वाढ
सोमवारी सक्तवसुली संचालनालयाने (ED) खरातच्या नाशिक, पुणे आणि शिर्डीसह 25 ठिकाणांवर मोठी कारवाई केली. या छाप्यात ईडीने 42 लाख रुपयांची रोकड आणि अनेक आलिशान गाड्या जप्त केल्या आहेत. आयकर विभाग आणि ईडीच्या हाती अशी काही महत्त्वाची कागदपत्रे लागली आहेत, ज्यामुळे खरातचे धाबे दणाणले आहेत.

‘मोठी नावे वाचवण्यासाठी एन्काऊंटरचा घाट’
प्रणिती शिंदे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना थेट सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या, “अशोक खरातचे संबंध सध्याच्या सत्ताधारी मंत्र्यांशी आणि बड्या नेत्यांशी आहेत. जर त्याने तोंड उघडले तर अनेक दिग्गज अडचणीत येतील. ही नावे समोर येऊ नयेत म्हणूनच त्याचा एन्काऊंटर केला जाण्याची शक्यता मला वाटते.”

हेही वाचा – Ladki Bahin Yojana E-Kyc : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! आता ई-केवायसी करताना काळजी घेण्याचे आदिती तटकरेंचे आवाहन

महिला आरक्षणावरुनही ओढले ताशेरे
“एकीकडे सरकार महिला आरक्षणाच्या गप्पा मारते, पण दुसरीकडे अशा भोंदूबाबांना पाठीशी घालते ज्यांचे विचार महिलाविरोधी आहेत. अशा मानसिकतेचे लोक महिलांना न्याय कसा देणार?” असा सवालही प्रणिती शिंदे यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

दरम्यान, यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे की, ‘कोणाकडे खरात प्रकरणात काही पुरावे असतील तर ते त्यांनी SIT कडे सादर करावे. जेणेकरून याप्रकरणाचा तपास जलदगतीने करण्यास मदत होईल. सर्व राजकीय लोकप्रतिनिधी सर्वांना विनंती केली की तुमच्याकडे काही पुरावे असतील ते तुम्ही SIT ला द्या हे पुरावे न देता काहीतरी तोंडाच्या वाफा फेकण्याकरता लोक काहीही बोलत आहेत. अशा प्रकारचे विधान करून अशा चौकशी भकटवण्याचे काम प्रयत्न काही लोकप्रतिनिधी करतात. मीडियामध्ये आपण स्पेस घेण्याकरता काही लोकप्रतिनिधी असं विधान करत आहेत. परंतु, आपण काय बोलतो याची त्यांनी थोडी काळजी घेतली पाहिजे,’ असा सल्ला बावनकुळे यांनी प्रणिती शिंदे यांना दिला आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number