Petrol Diesel Shortage : पेट्रोल-डिझेल खरचं संपणार का? HPCL आणि BPCL ने दिलं स्पष्टीकरण

देशात खरोखरच इंधनाचा तुटवडा आहे का? यावर देशातील आघाडीच्या तेल कंपन्या, हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) आणि भारत पेट्रोलियम (BPCL) यांनी अधिकृत स्पष्टीकरण दिलं आहे.

Petrol Diesel Shortage : पेट्रोल-डिझेल खरचं संपणार का? HPCL आणि BPCL ने दिलं स्पष्टीकरण

Petrol Diesel Shortage: गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया आणि व्हॉट्सअ‍ॅपवर पेट्रोल-डिझेलच्या टंचाईबाबत पसरणाऱ्या बातम्यांनी सर्वसामान्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. अनेक शहरांतील पेट्रोल पंपांवर इंधन भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र, देशात खरोखरच इंधनाचा तुटवडा आहे का? यावर देशातील आघाडीच्या तेल कंपन्या, हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) आणि भारत पेट्रोलियम (BPCL) यांनी अधिकृत स्पष्टीकरण देऊन नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे.

इंधन टंचाईच्या बातम्या निराधार; पुरवठा साखळी सुरक्षित
HPCL आणि BPCL या दोन्ही कंपन्यांनी स्पष्ट केले आहे की, सोशल मीडियावर फिरणाऱ्या इंधन टंचाईच्या बातम्या पूर्णपणे खोट्या आणि निराधार आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील चढ-उतार किंवा मध्य पूर्वेतील तणावाच्या बातम्यांचा चुकीचा अर्थ लावून अफवा पसरवल्या जात आहेत. प्रत्यक्षात, देशात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून पुरवठा साखळी (Supply Chain) पूर्णपणे सामान्य आहे. तेल पुरवठ्यात कोणताही व्यत्यय आलेला नाही, असे कंपन्यांनी ठामपणे सांगितले आहे.

‘कृत्रिम टंचाई’ टाळण्यासाठी पंपांवर गर्दी करू नका
तेल कंपन्यांनी नागरिकांना विशेष विनंती केली आहे की, अफवांना बळी पडून पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी करू नका. जेव्हा हजारो लोक एकाच वेळी गरजेपेक्षा जास्त इंधन भरण्यासाठी पंपावर पोहोचतात, तेव्हा तिथे ‘कृत्रिम टंचाई’ निर्माण होते. ही परिस्थिती व्यवस्थापित करणे कठीण असते. “आम्ही सर्व ग्राहकांना अखंड इंधन पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहोत, कृपया केवळ अधिकृत स्त्रोतांकडून मिळालेल्या माहितीवरच विश्वास ठेवा,” असे आवाहन BPCL ने केले आहे.

हेही वाचा – Indigo Free Waiver: मध्यपूर्वेतील प्रवाशांना मोठा दिलासा; इंडिगोकडून 31 मार्चपर्यंत तिकीट रद्द केल्यास ‘पूर्ण शुल्क’ परत

भारताची ऊर्जा सुरक्षा मजबूत; साठा पुरेसा
देशाच्या ऊर्जा सुरक्षेबाबत सरकार आणि तेल कंपन्यांनी पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. HPCL ने आश्वासन दिले आहे की, ‘देशभरात पेट्रोलियम उत्पादनांचा पुरेसा साठा राखला जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर काही किरकोळ संकटे आली तरी, भारताकडे पुढील अनेक दिवसांसाठी पुरेल इतका इंधनाचा बॅकअप उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता संयम पाळावा आणि अफवांकडे दुर्लक्ष करावे, हेच सध्यातरी हिताचे आहे.’ 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number