Bharat Gogawale: ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी होणार? ठाकरेंचे खासदार शिंदे गटाच्या पहिल्या रांगेत दिसतील; भरत गोगावलेंचा खळबळजनक दावा

जे खासदार सध्या शांत आहेत, तेच लवकरच शिंदे सेनेच्या पहिल्या रांगेत दिसतील, असे विधान करत गोगावले यांनी राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे.

Bharat Gogawale: ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी होणार? ठाकरेंचे खासदार शिंदे गटाच्या पहिल्या रांगेत दिसतील; भरत गोगावलेंचा खळबळजनक दावा

Bharat Gogawale: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळत आहेत. ठाकरे गटाचे काही खासदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांवर आता मंत्री भरत गोगावले यांनी सूचक विधान केले आहे. “जे खासदार सध्या शांत आहेत, तेच लवकरच शिंदे सेनेच्या पहिल्या रांगेत दिसतील,” असे विधान करत गोगावले यांनी राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. ठाकरे गटाने जरी हा दावा फेटाळला असला तरी, गोगावले यांच्या दाव्यामुळे ‘ऑपरेशन टायगर’ अंतर्गत मोठे मासे गळाला लागल्याची चर्चा रंगली आहे.

‘गनिमी काव्या’ने होणार इनकमिंग; गोगावलेंचा सूचक इशारा
खासदारांच्या संभाव्य पक्षांतराबाबत बोलताना गोगावले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘गनिमी कावा’ तंत्राचा उल्लेख केला. ते म्हणाले की, “काही गोष्टी उघड करायच्या नसतात. आम्ही गनिमी कावा वापरत आहोत. समोरचा पक्ष काय बोलतो यापेक्षा प्रत्यक्ष काय घडणार आहे, याची प्रचिती तुम्हाला थोड्याच दिवसांत येईल.” त्यांच्या या विधानामुळे येत्या काळात ठाकरे गटाला मोठे खिंडार पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, शिंदे गटाने अत्यंत गुप्तपणे ही रणनीती आखल्याचे समजते.

ओमराजे निंबाळकरांची अनुपस्थिती आणि राजकीय तर्कवितर्क
धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकाच मंचावर येणे टाळल्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले होते. यावर भाष्य करताना भरत गोगावले यांनी अधिक माहिती देणे टाळले, मात्र “सध्या ज्या चर्चा सुरू आहेत त्या अत्यंत सकारात्मक आहेत,” असे म्हणत त्यांनी सस्पेन्स कायम ठेवला. ओमराजे यांच्या भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून, शिंदे गटाकडून त्यांच्या बाबत विशेष सकारात्मकता दाखवली जात आहे.

हेही वाचा – Rohit Pawar: नेत्यांचे ब्लॅक मॅजिक, हनी ट्रॅप आणि ब्लॅकमेलिंग; रोहित पवारांनी उघडली खरात प्रकरणाची कुंडली

निधी वाटपाचे सूत्र आणि कुणाल कामरा प्रकरणावर टीका
राजकीय घडामोडींसोबतच गोगावले यांनी महायुतीतील अंतर्गत विषयांवरही स्पष्टीकरण दिले. निधी वाटपाबाबत बोलताना ते म्हणाले की, महायुतीमध्ये 60:40 या प्रमाणानुसार निधीचे वाटप ठरलेले असून, भाजपची कोणतीही दडपशाही सुरू नाही. सर्व घटक पक्षांना न्याय दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, कॉमेडियन कुणाल कामरा याच्याशी संबंधित वादावर भाष्य करताना, “अशा लोकांना आम्ही किंमत देत नाही,” असे म्हणत गोगावले यांनी हा विषय फेटाळून लावला. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number