Jayant Patil On Fuel Crisis: देशात पुन्हा लॉकडाऊन लागणार? जयंत पाटलांचा ‘त्या’ विधानाने खळबळ

कोरोनाकाळाप्रमाणे आता देशाला एका वेगळ्या प्रकारच्या लॉकडाऊनचा सामना करावा लागेल की काय, अशी भीती जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.<br/>

Jayant Patil On Fuel Crisis: देशात पुन्हा लॉकडाऊन लागणार? जयंत पाटलांचा ‘त्या’ विधानाने खळबळ

Jayant Patil On Fuel Crisis: राष्ट्रावादी काँग्रेश शरद पवार गट नेते जयंत पाटील यांनी देशातील इंधन तुटवड्यावर भाष्य केलं आहे. 'देशातील इंधनाची स्थिती इतकी भीषण आहे की, पेट्रोलचे दर लवकरच 130 रुपयांचा टप्पा ओलांडतील. आज नागरिक पेट्रोल-डिझेलसाठी रांगा लावून एकमेकांशी संघर्ष करत आहेत. ही परिस्थिती पाहता, कोरोनाकाळाप्रमाणे आता देशाला एका वेगळ्या प्रकारच्या लॉकडाऊनचा सामना करावा लागेल की काय,' अशी भीती जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

गृहमंत्र्यांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह
दरम्यान, शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यात बोलताना जयंत पाटील यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, "काही दिवसांपूर्वीच देशाच्या गृहमंत्र्यांनी सहा महिने पुरेल इतका इंधन साठा असल्याचे सांगितले होते. मात्र, महिना उलटण्यापूर्वीच त्यांचे नेते नागरिकांना बाहेर न पडण्याचे आणि सोने खरेदी न करण्याचे आवाहन करत आहेत. ही विसंगती सरकारचे अपयश दर्शवते."

व्हीव्हीआयपी संस्कृतीवर ओढले ताशेरे
तथापी, मंत्र्यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर भाष्य करताना पाटील यांनी मुख्यमंत्र्यांनाही लक्ष्य केले. 'मंत्र्यांच्या सुरक्षेसाठी 15-20 गाड्यांचा ताफा फिरवण्याची आता गरज नाही. स्वतः पंतप्रधान जर आपला ताफा कमी करून फिरत असतील, तर आपल्या मुख्यमंत्र्यांनीही त्याचे अनुकरण करून सामान्य गाडीतून प्रवास करावा,' अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आर्थिक संकट असताना सरकारी खर्चात कपात करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा – Eknath Shinde Operation Tiger : मोठी बातमी! ठाकरेंचे खासदार फुटणार? हिंगोलीतील खासदार शिंदेंच्या भेटीला

शेतकरी आणि कष्टकऱ्यांची उपेक्षा
केंद्रातील सरकारवर टीका करताना त्यांनी सांगितले की, "दिल्लीतील शेतकरी आंदोलनाकडे सरकारने दुर्लक्ष केले. 'आमचे कोणी वाकडं करू शकत नाही' या अहंकारात हे सरकार बुडालेले आहे. कामगार कायदे बदलून त्यांचा संघर्ष दडपला जात आहे. या आर्थिक संकटाचा सर्वाधिक फटका शेतकरी आणि कष्टकऱ्यांन बसत असून, या मानसिकतेविरोधात एकवटण्याची गरज आहे."

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number