Waris Pathan : ‘गरिबांनाच मराठीची सक्ती का? अमराठी श्रीमंतांना बोलून दाखवायला सांगा’; रिक्षा-टॅक्सीचालकांच्या मराठी सक्तीवरून वारिस पठाण यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल

मुंबईतील टॅक्सी चालक आणि कामगारांवर कमी वेळात मराठी बोलण्याची सक्ती करण्याच्या निर्णयावरून एमआयएम (AIMIM) नेते वारिस पठाण यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

Waris Pathan : ‘गरिबांनाच मराठीची सक्ती का? अमराठी श्रीमंतांना बोलून दाखवायला सांगा’; रिक्षा-टॅक्सीचालकांच्या मराठी सक्तीवरून वारिस पठाण यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल

Waris Pathan : मुंबईतील टॅक्सी चालक आणि कामगारांवर कमी वेळात मराठी बोलण्याची सक्ती करण्याच्या निर्णयावरून एमआयएम (AIMIM) नेते वारिस पठाण यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. “मी मराठी भाषेचा आदर करतो, पण केवळ पोटासाठी परराज्यातून आलेल्या गरीब कष्टकऱ्यांवरच भाषेची दादागिरी का केली जाते?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. सक्ती करण्याऐवजी सरकारने या लोकांना भाषा शिकवण्यासाठी योग्य कार्यक्रम राबवावा, असेही त्यांनी सुचवले आहे.

अंबानी आणि सुपरस्टार्सना सक्ती का नाही?
वारिस पठाण यांनी या मुद्द्यावरून श्रीमंत आणि गरीब यांच्यातील भेदभावावर बोट ठेवले आहे. ते म्हणाले की, “मुंबईत राहणाऱ्या अंबानींसारख्या मोठ्या व्यक्तींना तुम्ही मराठी बोलण्यास सांगू शकता का? इथे अनेक मोठे सुपरस्टार्स राहतात, त्या प्रत्येकाला मराठी येते का? तुम्ही नेहमी केवळ टॅक्सी चालक आणि गरिबांनाच लक्ष्य का करता? गरिबांवरच असा जुलूम करणे हा त्यांच्यावर अन्याय आहे.” केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या लोकांवर दबाव टाकणे चुकीचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

तमिळनाडूचे दिले उदाहरण
भाषेच्या सक्तीवरून निर्माण होणाऱ्या पेचावर भाष्य करताना पठाण यांनी स्वतःचे उदाहरण दिले. “जर मी तमिळनाडूला गेलो आणि मला तमिळ भाषा येत नसेल, तर तिथे लोकांनी मला पकडून तमिळ बोलायला लावणे कितपत योग्य आहे?” असा प्रश्न त्यांनी विचारला. कोणत्याही व्यक्तीला नवीन भाषा आत्मसात करण्यासाठी वेळ देणे आवश्यक असते, परंतु अत्यंत कमी मुदतीत अशी अट लादणे हा अत्याचार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – Eknath Shinde offered Bacchu Kadu : एकीकडे शिंदेंकडून ऑफर, तर दुसरीकडे रवी राणा यांच्यासोबत फोनवरून चर्चा; राजकीय चर्चांना उधाण

सक्ती नको, भाषा शिकवा
मराठी भाषा येणे आवश्यक आहे यावर पठाण यांनी सहमती दर्शवली असली, तरी ती लादण्याच्या पद्धतीला त्यांनी विरोध केला आहे. “अनेक लोक इथे केवळ कुटुंबाचे पोट भरण्यासाठी येतात. त्यांच्यावर अचानकपणे अशी सक्तीची अट लादण्यापेक्षा त्यांना प्रेमाने मराठी शिकवण्याचे उपक्रम राबवले पाहिजेत,” असे मत त्यांनी व्यक्त केले. भाषेच्या नावाखाली गरिबांना छळणे थांबवावे, अशी मागणी आता या निमित्ताने वारिस पठाण यांनी केली आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number