Rohini Acharya : आधी किडनी देऊन वडिलांना वाचवलं…, आता तोडले कुटुंबीयांशी संबंध; कुटुंबातील वाद चव्हाट्यावर आणणाऱ्या रोहिणी आचार्य आहेत तरी कोण?

यादव कुटुंबातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून, विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर कुटुंबात काही तरी बिनसल्याचे समोर आले आहे. याशिवाय, रोहिणी यांनी माध्यमांसमोरही काही धक्कादायक बाबी सांगितल्या आहेत.

Rohini Acharya : आधी किडनी देऊन वडिलांना वाचवलं…, आता तोडले कुटुंबीयांशी संबंध; कुटुंबातील वाद चव्हाट्यावर आणणाऱ्या रोहिणी आचार्य आहेत तरी कोण?

Rohini Acharya Saved Lalu Prasad Yadav's Life : बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाला (RJD) केवळ 25 जागा मिळाल्याने लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांना मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीतील अपयशानंतर लालू प्रसाद यादव यांची कन्या आणि तेजस्वी यादव यांची बहीण असलेल्या रोहिणी आचार्य यांनी थेट कुटुंबीयांशी सर्व संबंध तोडल्याची आणि राजकारण सोडण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे यादव कुटुंबातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून, विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर कुटुंबात सर्वकाही ठीक चालले नसल्याचे दिसून आले आहे. एकेकाळी आपल्या वडिलांना, लालू प्रसाद यादव यांना स्वतःची किडनी देऊन वाचवणाऱ्या रोहिणी आचार्य यांनी आता हे कठोर पाऊल का उचलले, याबद्दल राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या आहेत.

रोहिणी आचार्य या बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव आणि राबडी देवी यांच्या दुसऱ्या कन्या आहेत. लालू-राबडी दाम्पत्याला एकूण नऊ अपत्ये आहेत. व्यवसायाने त्या डॉक्टर असून, त्यांनी एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केलेले आहे. 2022 साली जेव्हा लालू प्रसाद यादव यांची प्रकृती खालावली, तेव्हा रोहिणी आचार्य यांनी वडिलांना स्वतःची किडनी देऊन जीवनदान दिले होते. त्यांची ही कृती त्यावेळी खूप गाजली होती.

हेही वाचा – Bihar Political Update : सत्ता स्थापनेसाठी हालचालींना वेग; चिराग पासवान यांनी नितीश कुमारांची घेतली भेट

या घटनेपासून कुटुंबापासून दूर झाल्याची चर्चा
रोहिणी आचार्य या सोशल मीडियावर आपली रोखठोक मते व्यक्त करण्यासाठी ओळखल्या जातात. काही महिन्यांपूर्वी, त्यांनी यादव कुटुंबाच्या पारंपरिक मतदारसंघातून म्हणजेच सारणमधून लोकसभा निवडणूक लढवली, परंतु त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. या पराभवानंतरच त्यांचे आणि कुटुंबात दुरावा निर्माण झाला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर त्या नाराज असल्याचे बोलले जात होते आणि तेव्हापासूनच कुटुंबात काहीतरी बिनसल्याचे संकेत मिळत होते.

यादव कुटुंबातले वाढते वाद
सध्या रोहिणी आचार्य यांच्या या घोषणेमुळे लालू प्रसाद यादव यांचे कुटुंब पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. काही दिवसांपूर्वीच लालू प्रसाद यादव यांनी त्यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव यांची कुटुंबातून हकालपट्टी केली होती. त्यानंतर आता रोहिणी आचार्य यांनी स्वतःहून कुटुंबापासून दूर जाण्याचा निर्णय जाहीर केल्यामुळे, यादव कुटुंबात वाद वाढत असल्याचे सर्वांसमोर आला आहे. त्यांच्या राजकारण सोडण्याच्या निर्णयामुळे भविष्यात RJD आणि कुटुंबाच्या राजकीय समीकरणांवर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा – Rohini Acharya : 'तुम्हाला चपलेनं मारलं जाईल…, त्यांनीच मला कुटुंबातून बाहेर काढलं'; रोहिणी आचार्य यांचे कुटुंबियांबाबत धक्कादायक खुलासे

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number