Baramati By Elections Exit Polls: बारामतीची सत्ता कोणाच्या हाती? पोटनिवडणुकीच्या एक्झिट पोलने राजकीय वर्तुळात खळबळ

आहे. मतदानाचा एकूण टक्का आणि मतदारांचा कल पाहता, सुनेत्रा पवार विजयाचा एक नवा आणि अभूतपूर्व विक्रम प्रस्थापित करण्याची शक्यता राजकीय तज्ञांकडून वर्तवली जात आहे.<br/>

Baramati By Elections Exit Polls: बारामतीची सत्ता कोणाच्या हाती? पोटनिवडणुकीच्या एक्झिट पोलने राजकीय वर्तुळात खळबळ

Baramati By Elections Exit Polls: राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा 'एक्झिट पोल' जाहीर झाला असून, यामध्ये अत्यंत धक्कादायक आणि ऐतिहासिक आकडेवारी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना या निवडणुकीत प्रचंड जनमत मिळताना दिसत आहे. मतदानाचा एकूण टक्का आणि मतदारांचा कल पाहता, सुनेत्रा पवार विजयाचा एक नवा आणि अभूतपूर्व विक्रम प्रस्थापित करण्याची शक्यता राजकीय तज्ञांकडून वर्तवली जात आहे.

'पोल पंडित'चा थक्क करणारा अंदाज: लाखांच्या मताधिक्याची शक्यता
'पोल पंडित' या संस्थेने जाहीर केलेल्या एक्झिट पोलनुसार, बारामतीकरांनी सुनेत्रा पवार यांच्या पारड्यात भरभरून दान टाकले आहे. या अंदाजानुसार, सुनेत्रा पवार यांना तब्बल 92 ते 97 टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे. त्यांना 1 ते 2 लाखांच्या दरम्यान मते मिळू शकतात, जो बारामतीच्या निवडणूक इतिहासातील सर्वात मोठा आकडा ठरेल.

राहुरीचा कौल
दरम्यान, बारामतीसोबतच राहुरी पोटनिवडणुकीतही भाजपचे अक्षय कर्डिले यांना 95 हजार ते 1 लाख मते मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

भावनिक लाट आणि 'बिनविरोध'च्या प्रयत्नांचा परिणाम
अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेसाठी झालेली ही निवडणूक अत्यंत भावनिक ठरली. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सुरुवातीला सर्वच स्तरांतून प्रयत्न झाले होते. काँग्रेसने आपला उमेदवार मागे घेत सुनेत्रा पवारांना पाठिंबा जाहीर केला, तर महाविकास आघाडीनेही अधिकृत उमेदवार दिला नाही. परिणामी, ही लढत सुनेत्रा पवार विरुद्ध 22 अपक्ष अशी झाली. अजित पवारांच्या आठवणीत बारामतीकरांनी ही निवडणूक एक 'श्रद्धांजली' म्हणून हातात घेतल्याचे चित्र मतदानाच्या दिवशी स्पष्टपणे पाहायला मिळाले.

हेही वाचा – PM Modi on BJP Victory Claim: '5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजप विजयाची हॅट्ट्रिक साधणार…'; बंगालमधील मतदानादरम्यान पंतप्रधान मोदींचा दावा

4 मे रोजी होणार अधिकृत घोषणा
या हायव्होल्टेज पोटनिवडणुकीची प्रत्यक्ष मतमोजणी 4 मे 2026 रोजी होणार आहे. जरी एक्झिट पोलचे आकडे सुनेत्रा पवारांच्या बाजूने एकतर्फी झुकलेले दिसत असले, तरी प्रत्यक्ष निकाल काय येतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. सुनेत्रा पवार खरोखरच 97 टक्क्यांचा जादुई आकडा गाठून नवा इतिहास रचणार का, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे लागले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number