Shiv Sena Star Campaigners List : कोण आहेत शिंदेंचे 40 शिलेदार? महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेची मोठी घोषणा

राज्यातील 29 महानगरपालिकांच्या प्रचारासाठी शिवसेनेने आपल्या 40 दिग्गज नेत्यांची 'स्टार प्रचारक' म्हणून अधिकृत यादी जाहीर केली आहे.

Shiv Sena Star Campaigners List : कोण आहेत शिंदेंचे 40 शिलेदार? महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेची मोठी घोषणा

Shiv Sena Star Campaigners List : आगामी महापालिका निवडणुकांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने कंबर कसली आहे. राज्यातील 29 महानगरपालिकांच्या प्रचारासाठी शिवसेनेने आपल्या 40 दिग्गज नेत्यांची 'स्टार प्रचारक' म्हणून अधिकृत यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे, या यादीतून आमदार भावना गवळी यांचे नाव वगळण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

ठाकरे बंधूंच्या युतीला शिंदेचे उत्तर

आज मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीसाठी आपली युती जाहीर केली. नेमक्या याच मुहूर्तावर एकनाथ शिंदे यांनी आपली प्रचारकांची यादी प्रसिद्ध करत आपले शिलेदार मैदानात उतरवले आहेत. यावेळी बोलताना शिंदे यांनी विरोधकांवर प्रहार केला. 'लोकशाहीत आघाड्या होत असतात, पण आमची महायुती जनतेसाठी आहे. आज झालेली नवी युती केवळ सत्ता, खुर्ची आणि स्वार्थासाठी आहे,' अशी बोचरी टीका एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूंवर केली.

हेही वाचा – Kudal Court Arrest Warrant : मंत्री नितेश राणेंना कुडाळ न्यायालयाकडून अटक वॉरंट जारी; दोन आमदारांनाही दणका

शिवसेनेचे प्रमुख स्टार प्रचारक 

एकनाथ शिंदे, मुख्य नेते व उप-मुख्यमंत्री
रामदास कदम, नेते
गजानन कीतीकर, नेते
आनंदराव अडसूळ, नेते
डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे, खासदार आणि शिवसेना संसदीय गट नेते
प्रतापराव जाधव, केंद्रीय मंत्री
डॉ.निलमताई गोन्हे, नेत्या
मिनाताई कांबळी, नेत्या
गुलाबराव पाटील, नेते व मंत्री
दादाजी भुसे, उपनेते व मंत्री
उदय सामंत, उपनेते व मंत्री
शंभूराज देसाई, उपनेते व मंत्री
संजय राठोड, मंत्री
संजय शिरसाट, प्रवक्ते व मंत्री
भरतशेठ गोगावले, उपनेते व मंत्री
प्रकाश आबिटकर, मंत्री
प्रताप सरनाईक, मंत्री
आशिष जयस्वाल, राज्यमंत्री
योगेश कदम, राज्यमंत्री
दिपक केसरकर, प्रवक्ते व आमदार
श्रीरंग बारणे, उपनेते व खासदार
धैर्यशील माने, खासदार
संदीपान भुमरे, खासदार
नरेश म्हस्के, खासदार
रवींद्र वायकर, खासदार
मिलिंद देवरा, खासदार
दिपक सावंत, उपनेते व माजी मंत्री
शहाजी बापू पाटील, उपनेते व माजी आमदार
राहुल शेवाळे, उपनेते व माजी खासदार
मनिषा कायंदे, सचिव व आमदार
निलेश राणे, आमदार
संजय निरुपम, प्रवक्ते
राजू वाघमारे, प्रवक्ते
ज्योती वाघमारे, प्रवक्ते
पूर्वेश सरनाईक, युवासेना कार्यध्यक्ष
राहुल लोंढे, युवसेना सचिव
अक्षयमहाराज भोसले, शिवसेना प्रवक्ते व अध्यक्ष, शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना
समिर काझी, कार्याध्यक्ष, अल्पसंख्याक विभाग
शायना एन.सी., राष्ट्रीय प्रवक्त्या
गोविंदा अहुजा, माजी खासदार

हेही वाचा – Supriya Sule On NCP Alliance : 'अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही, पण…'; पुण्यातील राष्ट्रवादीच्या संभाव्य युतीवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

यादीमध्ये पक्षाचे अनुभवी नेते, केंद्रीय मंत्री आणि तरुण चेहऱ्यांचा समतोल साधण्यात आला आहे. नगरपरिषद निवडणुकीत स्थान असलेल्या भावना गवळींना महापालिकेच्या यादीतून बाहेर ठेवण्यात आले आहे. तथापी, युवासेनेचे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी पूर्वेश सरनाईक आणि राहुल लोंढे यांचा समावेश करण्यात आला आहे. तथापी, अध्यात्मिक आणि अल्पसंख्याक मतांना साद घालण्यासाठी अक्षयमहाराज भोसले आणि समीर काझी यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दरम्यान, संजय मोरे यांनी ही अधिकृत यादी जाहीर केली असून, आता आगामी महापालिका निवडणुकीत 'शिंदे विरुद्ध ठाकरे' असा हायव्होल्टेज सामना पाहायला मिळणार हे निश्चित झाले आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number