Sanjay Raut: ‘खरात बाबांकडे तुमच्या मंत्रिमंडळातील कोणते मंत्री जात होते?’; संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल

तुमच्या मंत्रिमंडळातील कोणते मंत्री सातत्याने खरात बाबांकडे जात होते? असा थेट सवाल राऊतांनी उपस्थित करत भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.<br/>

Sanjay Raut: ‘खरात बाबांकडे तुमच्या मंत्रिमंडळातील कोणते मंत्री जात होते?’; संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल

Sanjay Raut: महाराष्ट्रातील अंधश्रद्धा आणि खरात बाबा प्रकरणावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. शिवसेना (ठाणे गट) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. “तुमच्या मंत्रिमंडळातील कोणते मंत्री सातत्याने खरात बाबांकडे जात होते?” असा थेट सवाल राऊतांनी उपस्थित करत भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांना मंत्रिमंडळाचेच बळ?
संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना आरोप केला की, अशा ‘बुवाबाजी’ करणाऱ्या लोकांना सत्ताधाऱ्यांकडूनच बळ दिले जात आहे. “देवेंद्र फडणवीस म्हणतात की या प्रकरणात राजकारण करू नका, पण राजकारण नेमकं कशाला म्हणतात? अशा अंधश्रद्धा पसरवणाऱ्या बाबांना तुमच्या मंत्रिमंडळातील लोकच शक्ती देत आहेत. संत गाडगे महाराज, प्रबोधनकार ठाकरे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्रात हे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत,” असे राऊत यांनी ठणकावून सांगितले.

भाजपच्या नेत्यांसोबतचे फोटो  
राऊत पुढे म्हणाले की, मते मिळवण्यासाठी आणि सत्ता टिकवण्यासाठी भाजप अशा बाबांचा आधार घेत आहे. “खरात बाबांचे भाजपमधील बड्या नेत्यांसोबतचे फोटो सर्वांनी पाहिले आहेत. अमित शहा, चंद्रकांत पाटील यांच्यासोबत त्यांचे फोटो आहेत. उद्या कदाचित या बाबांना भाजपमध्ये घेऊन त्यांचे ‘शुद्धीकरण’ देखील केले जाईल,” असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यावर जबाबदार भूमिका मांडणे गरजेचे आहे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

मंत्र्यांचे मानसिक संतुलन बिघडले?
सत्ताधारी पक्षातील आमदार आणि खासदार या बाबांकडे सातत्याने जात होते, असा दावा करत राऊत यांनी मंत्र्यांच्या मानसिक स्थितीवरही भाष्य केले. “जर भाजपचे मंत्री अशा अंधश्रद्धांच्या आहारी जात असतील, तर त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे असे समजावे लागेल. महाराष्ट्राचा पुरोगामी वारसा जपण्यासाठी आणि या मंत्र्यांना सुधारण्यासाठी सरकारने त्यांच्यासाठी एखादे प्रबोधन शिबिर आयोजित करावे,” असा सल्लाही राऊतांनी दिला.

हेही वाचा – Raj Thackeray: ‘अशोक खरातसारखा नीच माणूस राजकारण्यांच्या आशीर्वादाने…’ राज ठाकरेंनी भोंदूबाबा प्रकरणावर केली जोरदार टीका

वारकरी संप्रदायाचा अपमान
महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा आहे. मात्र, अशा खोट्या बाबांना राजकारणात आणून वारकरी संप्रदायाची प्रतिमा मलिन केली जात असल्याचा आरोप राऊतांनी केला. “तुम्हाला तुमचा आत्मविश्वास टिकवण्यासाठी अशा बाबांचा आधार घ्यावा लागत असेल, तर हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे,” असे म्हणत त्यांनी फडणवीसांच्या नेतृत्वावर टीका केली.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number