Char Dham Yatra 2026: यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ अन् बद्रीनाथचे दरवाजे कधी उघडणार? जाणून घ्या महत्त्वाच्या तारखा आणि नियम

गेल्या 4 महिन्यांपासून सुरू असलेल्या अथक परिश्रमानंतर, उत्तराखंड सरकारने भाविकांना सुखद आणि सुरक्षित प्रवासाची खात्री दिली आहे.<br/>

Char Dham Yatra 2026: यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ अन् बद्रीनाथचे दरवाजे कधी उघडणार? जाणून घ्या महत्त्वाच्या तारखा आणि नियम

Char Dham Yatra 2026: उत्तराखंडची जगप्रसिद्ध 'चार धाम यात्रा 2026' यंदा 19 एप्रिल रोजी अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सुरू होत आहे. या दिवशी यमुनोत्री आणि गंगोत्री धामांचे दरवाजे भाविकांसाठी खुले होतील. त्यानंतर 22 एप्रिल रोजी केदारनाथ आणि 23 एप्रिल रोजी बद्रीनाथ धामाचे कपाट उघडले जाणार आहेत. गेल्या 4 महिन्यांपासून सुरू असलेल्या अथक परिश्रमानंतर, उत्तराखंड सरकारने भाविकांना सुखद आणि सुरक्षित प्रवासाची खात्री दिली आहे.

18 लाखांहून अधिक भाविकांची नोंदणी; आधार कार्ड अनिवार्य
यंदाच्या यात्रेसाठी आतापर्यंत 18 लाखांहून अधिक भाविकांनी आपली नोंदणी पूर्ण केली आहे. ही यात्रा हरिद्वार किंवा ऋषिकेश येथून सुरू होऊन यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ अशा क्रमाने पुढे जाते. नोंदणीसाठी आधार कार्ड (किंवा वैध ओळखपत्र) आणि मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. 2025 मध्ये 50 लाख भाविकांनी दर्शन घेऊन विक्रम प्रस्थापित केला होता, जो यंदा मोडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. डोंगराळ भागात हवामान थंड असल्याने भाविकांना उबदार कपडे सोबत ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

7,000 पोलीस कर्मचारी आणि 16 'सुपर झोन्स'
भाविकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. गढवाल विभागाचे पोलीस महानिरीक्षक (IG) राजीव स्वरूप यांनी माहिती दिली की, संपूर्ण यात्रा मार्गाची 16 'सुपर झोन्स', 43 'झोन्स' आणि 149 'सेक्टर्स'मध्ये विभागणी करण्यात आली आहे. सुरक्षेसाठी 7,000 पोलीस कर्मचारी तैनात असून मे महिन्याच्या सुरुवातीला केंद्रीय निमलष्करी दलाच्या 15 तुकड्याही दाखल होणार आहेत. तसेच, ठिकठिकाणी 'थर्मल स्क्रीनिंग'ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

हेही वाचा – Akshaya Tritiya 2026 : अक्षय्य तृतीयेला घरात लावा तुळशीचे नवे रोप; सुखाची होईल भरभराट

हवामानाचे आव्हान आणि आपत्ती व्यवस्थापन सज्ज
हवामान विभागाने 21 एप्रिलपर्यंत राज्यात पाऊस आणि हिमवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन विभागाने सर्व जिल्ह्यांना 'हाय अलर्ट'वर ठेवले आहे. भूस्खलनाची शक्यता असलेल्या संवेदनशील भागात SDRF, PWD and BRO च्या पथकांसह JCB यंत्रसामग्री तैनात करण्यात आली आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी स्वतः यात्रा मार्गाची पाहणी करून सर्व सोयीसुविधांचा आढावा घेतला असून, ही यात्रा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा असल्याचे नमूद केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number