भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? तरार यांच्यानंतर आता अब्दुल बासित यांनी सांगितली तारीख

पाकिस्तानचे मंत्री अताउल्लाह तरार यांच्यानंतर आता अब्दुल बासित यांनी दावा केला आहे की, भारत लवकरच पाकिस्तानवर हल्ला करू शकतो. अब्दुल बासित हे भारतात पाकिस्तानचे उच्चायुक्त होते.

भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? तरार यांच्यानंतर आता अब्दुल बासित यांनी सांगितली तारीख
Edited Image

इस्लामाबाद: भारत आणि पाकिस्तानमधील तणाव सतत शिगेला पोहोचत आहे. दरम्यान, पाकिस्तानचे मंत्री अताउल्लाह तरार यांच्यानंतर आता अब्दुल बासित यांनी दावा केला आहे की, भारत लवकरच पाकिस्तानवर हल्ला करू शकतो. अब्दुल बासित हे भारतात पाकिस्तानचे उच्चायुक्त होते. त्यांनी दिल्लीत बराच काळ घालवला आहे. बासित यांच्या मते, भारत ‘मर्यादित दुर्दैवी’ कारवाई करेल. भारत रशियातील विजय दिनाचा उत्सव संपण्याची वाट पाहत होता. त्यांनी दावा केला की, भारत पाकिस्तानवर 10 किंवा 11 मे रोजी हल्ला करेल.

हेही वाचा – सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरुच, पाककडून सलग 12व्या दिवशी शस्त्रसंधीचं उल्लंघन

पाकिस्तानी मंत्र्यांकडून अणुहल्ल्याच्या धमक्या – 

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध अनेक कठोर निर्णय घेतले आहेत. सिंधू पाणी करार रद्द झाल्यापासून, अनेक पाकिस्तानी मंत्र्यांनी भारताला सतत अणुहल्ल्याच्या धमक्या दिल्या आहेत. दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री अताउल्लाह तरार यांनीही एका मुलाखतीत म्हटले होते की, जर भारताने पाणी थांबवले तर आमच्याकडेही पर्याय आहेत. पाकिस्तान हा अणुशक्तीचा देश आहे, आम्हाला स्वतःचे रक्षण करण्याचा अधिकार आहे.

हेही वाचा – ‘संयम बाळगा, सैन्य कारवाई हा काही उपाय नाही’; संयुक्त राष्ट्राकडून भारत आणि पाकिस्तानला सल्ला

पाकिस्तान अणुहल्ला करेल – 

दरम्यान, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आणि परराष्ट्र मंत्री यांनीही यापूर्वी भारताला धमकी दिली आहे होती की, जर भारताने हल्ला केला तर पाकिस्तान अणुहल्ला करेल. याशिवाय रशियातील पाकिस्तानी राजदूत मोहम्मद खालिद जमाली यांनी म्हटलं होतं की, र भारताने पाकिस्तानवर हल्ला केला किंवा सिंधू नदीचे पाणी थांबवले तर पाकिस्तान केवळ पारंपारिक शस्त्रांनीच नव्हे तर अण्वस्त्रांनीही प्रत्युत्तर देईल. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number