Sanjay Raut vs Sanjay Shirsat: ‘जे तुम्हाला शक्य झालं नाही ते महायुतीनं…’; कर्जमाफीवरून राऊतांनी केलेल्या विधानाला शिरसाट यांच्याकडून प्रत्युत्तर

शेतकरी कर्जमाफीच्या घोषणेनंतर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी सरकारच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Sanjay Raut vs Sanjay Shirsat: ‘जे तुम्हाला शक्य झालं नाही ते महायुतीनं…’; कर्जमाफीवरून राऊतांनी केलेल्या विधानाला शिरसाट यांच्याकडून प्रत्युत्तर

Sanjay Raut vs Sanjay Shirsat: राज्याच्या अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ शेतकरी कर्जमाफी योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध पेटले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कर्जमाफीच्या अंमलबजावणीवर शंका उपस्थित करत सरकारवर जोरदार टीका केली. या टीकेला उत्तर देताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी “जे तुम्हाला जमले नाही, ते मुख्यमंत्री फडणवीस यांनी करून दाखवले,” अशा शब्दांत पलटवार केला आहे.

संजय राऊत यांचा सरकारवर निशाणा
शेतकरी कर्जमाफीच्या घोषणेनंतर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी सरकारच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “शेतकऱ्यांना खरोखरच कर्जमाफी मिळणार का, हे येणारा काळच सांगेल,” असं म्हटलं आहे. तसेच, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या हमीभावाच्या वचनाचीही आठवण करून दिली. “केवळ घोषणा करून चालणार नाही, तर दिलेल्या वचनांची पूर्तता होणे गरजेचे आहे,” असे राऊत यांनी नमूद केले.

संजय शिरसाटांचे चोख प्रत्युत्तर: “अभिनंदन करायचे सोडून प्रश्न विचारता?”
संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर देताना संजय शिरसाट यांनी विरोधकांच्या ‘भ्रमाचा भोपळा’ फुटल्याचे म्हटले. ते म्हणाले, “शेतकरी अनेक नैसर्गिक संकटांमुळे अडचणीत आहे. कधी पावसाचा तडाका तर कधी हवामानातील बदल, यामुळे शेतकरी आत्महत्यांसारख्या विदारक परिस्थितीला सामोरे जात आहे. अशा वेळी सरकारने त्याला दिलासा दिला असेल, तर त्याचे अभिनंदन करायला हवे.” जे काम ठाकरे सरकारला शक्य झाले नाही, ते महायुती सरकारने करून दाखवल्याचे सांगत त्यांनी विरोधकांवर टीका केली.

हेही वाचा – Devendra Fadnavis: ‘इंधन टंचाईच्या अफवांवर विश्वास ठेवू नका…’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जनतेला आवाहन

कर्जमाफी आणि राजकीय दरी
शिरसाट यांनी पुढे असेही स्पष्ट केले की, शेतकरी या अडचणीतून बाहेर पडावा, हाच सरकारचा प्रामाणिक प्रयत्न आहे. कर्जमाफीला विरोध करणाऱ्या किंवा त्यावर शंका घेणाऱ्यांनी आधी आपली अपयश तपासावीत, असा टोलाही त्यांनी लगावला. अर्थसंकल्पातील या मोठ्या घोषणेमुळे ग्रामीण भागात महायुतीची पकड मजबूत होत असतानाच, विरोधकांनी मात्र या योजनेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित करणे सुरूच ठेवले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number