Chhagan Bhujbal: जय पवारांनी शेअर केलेल्या ‘त्या’ व्हिडीओचं सत्य काय? छगन भुजबळांचा खळबळजनक खुलासा

जय पवार यांनी सोशल मीडियावर शेअर केलेला 'झोपलेल्या वैमानिकाचा' व्हिडीओ नेमका कोणाचा, यावर भुजबळांनी स्पष्टीकरण दिले आहे.<br/>

Chhagan Bhujbal: जय पवारांनी शेअर केलेल्या ‘त्या’ व्हिडीओचं सत्य काय? छगन भुजबळांचा खळबळजनक खुलासा

Chhagan Bhujbal: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असतानाच, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी या प्रकरणातील काही महत्त्वाच्या गोष्टींवरून पडदा हटवला आहे. जय पवार यांनी सोशल मीडियावर शेअर केलेला ‘झोपलेल्या वैमानिकाचा’ व्हिडीओ नेमका कोणाचा, यावर भुजबळांनी स्पष्टीकरण दिले आहे.

‘तो’ व्हिडीओ अजितदादांच्या विमानाचा नाही – छगन भुजबळ 
गेल्या काही तासांपासून एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये वैमानिक झोपलेला दिसत आहे. यावर भाष्य करताना भुजबळ म्हणाले की, “जय पवार यांनी शेअर केलेला तो व्हिडीओ अजित पवारांच्या विमानातील नाही. तो दुसऱ्याच एका विमानाचा व्हिडीओ आहे. मात्र, वैमानिकाने अशा प्रकारे कर्तव्यावर असताना झोपणे हा अत्यंत गंभीर निष्काळजीपणा आहे,” असं त्यांनी यावेळी नमूद केलं.  

झाडाला विमान आदळल्याच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह
विमान लँडिंग करताना झाडाला धडकले, या चर्चेवर भुजबळांनी साशंकता व्यक्त केली. त्यांच्या मते, विमानतळावर शेकडो लोक आणि प्रसारमाध्यमे उपस्थित असतानाही, विमान झाडाला आदळल्याचे कोणालाही का दिसले नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. विमानाने पहिल्या प्रयत्नात लँडिंग रद्द केले होते. दुसऱ्या प्रयत्नात खाली येत असताना विमान एका बाजूला कलले होते. कदाचित त्यावेळी नियंत्रण मिळवण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नसावा, असा अंदाज भुजबळांनी वर्तवला.

हेही वाचा – Dhananjay Munde : कृषी घोटाळा प्रकरणात धनंजय मुंडेंना दिलासा, अंजली दमानियांचे सर्व आरोप लोकायुक्तांनी फेटाळले

DGCA कडे चौकशीची मागणी
हा अपघात की तांत्रिक बिघाड, याचा शोध घेण्यासाठी डीजीसीए (DGCA) मार्फत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे. विमानाचे लँडिंग का फसले आणि विमानाची स्थिती नेमकी कशी होती, हे चौकशीनंतरच स्पष्ट होईल, असेही ते म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number