Sharad Pawar: जे ठाकरेंसोबत घडलं, तेच आता पवारांसोबत घडणार; राष्ट्रवादीचे 6 खासदार नाराज? राजकीय वर्तुळात खळबळ

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) संदर्भात मोठा राजकीय दावा केला आहे.

Sharad Pawar: जे ठाकरेंसोबत घडलं, तेच आता पवारांसोबत घडणार; राष्ट्रवादीचे 6 खासदार नाराज? राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींची चर्चा रंगली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर आता शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही अस्वस्थता वाढल्याच्या चर्चा सुरू आहेत. नुकतेचं गेल्या काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या पक्षातील नेते अमोल कोल्हे यांनी महायूतीकडून ऑफर आली तर आम्ही विचार करु असं मोठं वक्तव्य केलं होत. इतकचं नव्हे तर जयंत पाटील यांनी भाजप नेते विनोद तावडे यांची भेट देखील घेतली होती. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात गेल्या काही दिवसांपासून दोन गटात मतभेद असल्याचे देखील चित्र पाहायला मिळाले आहे. एकीकडे राष्ट्रवादीतील अंतर्गत घुसफूस सुरु असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. पक्षातील सहा खासदार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात वेगाने पसरत असून, यामुळे पक्षात पुन्हा एकदा मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) संदर्भात मोठा राजकीय दावा केला आहे. शरद पवार गटातील पाच ते सहा खासदार सध्या अस्वस्थ असल्याचा दावा त्यांनी केला असून, या खासदारांशी संपर्क साधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह प्रयत्नशील असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.

हेही वाचा – Raj Thackeray: 'मुंबई तुला BMC वर भरोसा नाय काय? म्हणणारी ती बाई गेली कुठंय?'; राज ठाकरेंचा RJ मलिष्काच्या गाण्यावरून सत्ताधाऱ्यांना टोला

चव्हाण यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले असून, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा मोठ्या राजकीय घडामोडी घडणार का, याबाबत तर्क-वितर्कांना वेग आला आहे. मात्र, पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या या दाव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नसल्याने या घडामोडींकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. काही दिवसांपूर्वीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील 9 पैकी 6 खासदारांनी पक्षाला राम राम ठोकले आणि शिवसेना शिंदेंच्या धणुष्यबाणाकडे वळले. असं असताना  आता पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या या धक्कादायक विधानामुळे  विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. तसेच  राष्ट्रवादीतही काही घडामोडी घडणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number