Pravin Togadia On Muslims: ‘भारतात मुसलमानांची संख्या वाढू देणार नाही…’; प्रवीण तोगडिया यांचा एल्गार

प्रवीण तोगडिया यांनी हिंदू धर्माच्या उत्कर्षासाठी आणि लोकसंख्या नियंत्रणासाठी अत्यंत आक्रमक भूमिका मांडली आहे.

Pravin Togadia On Muslims: ‘भारतात मुसलमानांची संख्या वाढू देणार नाही…’; प्रवीण तोगडिया यांचा एल्गार

Pravin Togadia On Muslims: आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे संस्थापक आणि विद्यमान अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी हिंदू धर्माच्या उत्कर्षासाठी आणि लोकसंख्या नियंत्रणासाठी अत्यंत आक्रमक भूमिका मांडली आहे. “राम मंदिर आता उभारले गेले आहे, आता आपण मुस्लिम लोकसंख्येच्या मुद्द्याकडे लक्ष दिले पाहिजे. तोगडिया ठोकून बनवून देतो, भारतात मुसलमानांची संख्या अनियंत्रितपणे वाढू देणार नाही,” असे खळबळजनक विधान त्यांनी केले आहे. यासाठीही कठोर कायदा बनवणार असल्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.

प्रभू श्रीरामाचे कार्य आणि गरिबांची सेवा
गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या आपल्या प्रवासावर भाष्य करताना तोगडिया म्हणाले की, ही मोहीम केवळ गाठीभेटींपुरती मर्यादित नसून गरिबांची सेवा आणि हिंदूंच्या उत्कर्षासाठी आहे. “मी एक खाजगी वैद्यकीय व्यावसायिक असलो, तरी लोकांच्या आरोग्यसेवा, रोजगाराच्या संधी आणि राहणीमान सुधारण्यासाठी प्रयत्नशील आहे. अगदी तलवारीच्या धाकासमोरही मी कधी मान वाकवली नाही. प्रभू श्रीरामाच्या कार्यासाठी मी आजही ठाम उभा आहे आणि पुढेही लढा देत राहीन,” असे त्यांनी ठणकावून सांगितले.

10 कोटी हिंदू कुटुंबांशी जोडण्याचे लक्ष्य
या मोहिमेचा मुख्य उद्देश 10 कोटी हिंदू कुटुंबांशी जोडले जाणे हा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. समाजात एकजूट निर्माण करण्यासाठी आणि राष्ट्रहितासाठी त्यांनी हनुमान चालिसेचे नियमित पठण करण्याचे आवाहन केले. आगामी वर्षभरात देशभरातील 1 लाख ठिकाणी सामूहिक हनुमान चालीसा पठणाचे कार्यक्रम आयोजित केले जातील, अशी माहितीही त्यांनी दिली. समाजाने आणि विशेषतः मुलींनी सुरक्षेच्या बाबतीत सदैव सतर्क राहावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

“कोणीही उपाशी राहणार नाही”; धान्य संकलनाची नवी योजना
तोगडिया यांनी केवळ धार्मिकच नव्हे, तर सामाजिक बांधिलकीवरही भर दिला. हिंदूंच्या मूलभूत गरजा अन्न, शिक्षण आणि रोजगार यांच्या पूर्ततेसाठी त्यांनी पाऊल उचलले आहे. “देशातील कोणताही हिंदू उपाशी राहणार नाही, हे आमचे ध्येय आहे. या उद्देशाने प्रत्येक हिंदू कुटुंबाकडून मूठभर धान्य गोळा करून ते गरजूंपर्यंत पोहोचवण्याची योजना आम्ही आखली आहे,” असे त्यांनी नमूद केले. सरकार आपली भूमिका पार पाडत असले, तरी हिंदू समाजानेही यात योगदान द्यावे, असे त्यांनी सुचवले.

हेही वाचा – Vertical Property Card:घर मालकांबाबत सरकारचा मोठा निर्णय; आता ‘व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड’ ठरणार वरदान, मिळणार अनेक फायदे

राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा
तोगडिया यांच्या या आक्रमक विधानांमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. “राम मंदिराप्रमाणेच लोकसंख्या नियंत्रणाचा कायदा बनवू,” या त्यांच्या विधानाने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.  
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number