Eknath Shinde: ‘आम्ही कोणतंही ऑपरेशन अर्धवट सोडत नाही…’; ओमराजेंच्या पक्ष प्रवेशावर एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'ऑपरेशन टायगर' आणि ओमराजेंच्या पक्षप्रवेशावर अत्यंत सूचक वक्तव्य केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.<br/>

Eknath Shinde: ‘आम्ही कोणतंही ऑपरेशन अर्धवट सोडत नाही…’; ओमराजेंच्या पक्ष प्रवेशावर एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

Eknath Shinde: धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पुढील राजकीय वाटचालीकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे लागले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या गटातील सहा खासदार फुटल्याची चर्चा असतानाच त्यात ओमराजेंच्या नावाचाही समावेश आहे. दरम्यान, वडिलांच्या मृत्यू प्रकरणाचा निकाल जाहीर झाल्यानंतर, ओमराजेंनी आपल्या सहकाऱ्यांशी आणि कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करूनच शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले होते. सध्या त्यांचे मन वळवण्याची आणि त्यांना पक्षात आणण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी आमदार तानाजी सावंत यांच्यावर सोपवण्यात आली असून ते धाराशिवमध्ये तळ ठोकून आहेत. या पार्श्वभूमीवर, मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'ऑपरेशन टायगर' आणि ओमराजेंच्या पक्षप्रवेशावर अत्यंत सूचक वक्तव्य केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

संवेदनशील काळात टीका करणे अयोग्य 
दरम्यान, पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना या प्रकरणावर आपली भूमिका मांडली. पवनराजे निंबाळकर खटल्याच्या निकालाचा संदर्भ देत ते म्हणाले की, निंबाळकर कुटुंब सध्या एका भावनिक आणि संवेदनशील परिस्थितीतून जात आहे. अशा अत्यंत नाजूक काळात त्यांच्यावर चिखलफेक करणे किंवा त्यांना शिवीगाळ करणे पूर्णपणे चुकीचे आणि असंवेदनशीलतेचे लक्षण आहे.

हेही वाचा – Maharashtra Monsoon Session: पावसाळी अधिवेशनापूर्वी विरोधकांचा इशारा; चहापानाच्या कार्यक्रमावर टाकणार बहिष्कार

एकनाथ शिंदेंचा थेट निशाणा
तथापि, ठाकरे गटाच्या दुटप्पी भूमिकेवर कडाडून टीका करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, जोपर्यंत ओमराजे त्यांच्यासोबत होते, तोपर्यंत ते तळागाळातील कार्यकर्ते होते. मात्र आता त्यांच्यावर 'रीलस्टार' म्हणून टीका केली जात आहे. ही ठाकरे गटाची दुटप्पी वृत्ती आहे. कारण ते सकाळी जाहीरपणे खासदारांना शिव्या घालतात आणि रात्री चोरून त्यांचे पाय धरतात. सध्या सुरू असलेल्या अफवांवर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, महायुती कोणतेही काम अर्धवट सोडत नाही. "थोडी प्रतीक्षा करा, लवकरच तुम्हाला मोठी ब्रेकिंग न्यूज मिळेल," असा सूचक इशारा देत शिंदेंनी ओमराजेंच्या संभाव्य पक्षप्रवेशाचे संकेत दिले आहेत. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number