Devendra Fadnavis : आम्ही ठरवलं होतं पण, अजित पवारांनी ‘तो’ शब्द पाळला नाही…देवेंद्र फडणवीसांनी पुण्यातील सभेत व्यक्त केली खदखद

पुण्यातील विकासावर बोलताना फडणवीस म्हणाले की, ही निवडणूक गल्लीबोळातील दादा तयार करण्याची नसून शहराचे भावी नेतृत्व घडवणारी आहे.

Devendra Fadnavis : आम्ही ठरवलं होतं पण, अजित पवारांनी ‘तो’ शब्द पाळला नाही…देवेंद्र फडणवीसांनी पुण्यातील सभेत व्यक्त केली खदखद

Devendra Fadnavis : महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर थेट निशाणा साधला. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात झालेल्या भाजपच्या सांगता सभेत ते बोलत होते. महापालिका निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) स्वतंत्र लढत आहेत. यावर भाष्य करताना मुख्यमंत्री म्हणाले, मी शब्द पाळणारा माणूस आहे. आपण एकमेकांविरुद्ध बोलायचे नाही असे ठरले होते, पण अजितदादांनी तो शब्द पाळला नाही, अशी खदखद यावेळी त्यांनी व्यक्त केली. आता ते माझ्या वरिष्ठांकडे माझी तक्रार करणार असतील, तर जोपर्यंत ते त्यांना भेटत आहेत, तोपर्यंत मी आनंदीच आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी अजित पवारांना लगावला. पुण्यात अजित पवार आमचे विरोधक असून दोन महापालिका वगळता इतर 27 महापालिकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढत असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. 

हेही वाचा – Election Campaign Deadline : निवडणूक आयोगाकडून राजकीय पक्षांना इशारा; प्रचाराची तोफ थंडावताच जाहिरातींवरही…

पुण्याच्या विकासाचा प्लॅन  

पुण्यातील विकासावर बोलताना फडणवीस म्हणाले की, ही निवडणूक गल्लीबोळातील दादा तयार करण्याची नसून शहराचे भावी नेतृत्व घडवणारी आहे. आमदार शिरोळे आणि निवडून येणाऱ्या 12 नगरसेवकांच्या पाठीशी मुख्यमंत्री म्हणून मी खंबीर उभा असून विकासासाठी हवा तेवढा निधी दिला जाईल, असंही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले. 

हेही वाचा – Voter List: तुमचं नाव मतदार यादीत आहे का? या सोप्या पद्धतीने तपासा मतदार यादीतील नाव आणि मतदान केंद्र

लाडकी बहीण आणि लखपती दीदी

विरोधकांवर टीका करताना मुख्यमंत्री म्हणाले की, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. जोपर्यंत तुमचा हा ‘देवाभाऊ’ मुख्यमंत्री आहे, तोवर ही योजना सुरूच राहील. आता 50 लाख महिला लखपती दीदी झाल्या असून ही संख्या आणखी वाढवायची आहे. केंद्रात आणि राज्यात आपले सरकार आहे, आता महापालिकेतही भाजपची सत्ता आणण्याचे आवाहन त्यांनी पुणेकरांना केले.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number