Uday Samant: ‘लपून-छपून नाही, थेट लवाजमा घेऊन गेलो होतो…’; जरांगे भेटीवर मंत्री उदय सामंत यांचा मोठा खुलासा

उदय सामंत म्हणाले की, 'मनोज जरांगे पाटील हे काही एवढे छोटे नेतृत्व नाही, ज्यांना कोणीही जाऊन काहीतरी सांगेल आणि ते आंदोलन सुरू करतील.'

Uday Samant: ‘लपून-छपून नाही, थेट लवाजमा घेऊन गेलो होतो…’; जरांगे भेटीवर मंत्री उदय सामंत यांचा मोठा खुलासा

Uday Samant: मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा आंदोलन करण्यासाठी शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनीच फुस लावली असल्याचा आरोप राजकीय वर्तुळातून केला जात आहे. या आरोपांवर आज उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना अत्यंत स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली आणि आपल्यावरचे सर्व आरोप पूर्णपणे खोडून काढले. उदय सामंत म्हणाले की, ‘मनोज जरांगे पाटील हे काही एवढे छोटे नेतृत्व नाही, ज्यांना कोणीही जाऊन काहीतरी सांगेल आणि ते आंदोलन सुरू करतील. त्यांना मराठा समाजातील लाखो लोक आपले नेते मानतात, त्यामुळे त्यांची स्वतःची एक स्वतंत्र भूमिका आहे. जर लपून-छपून भेटायचे असते तर मी थेट माझ्या सुरक्षारक्षकांचा लवाजमा घेऊन त्यांच्या दारात गेलो नसतो,’ असेही सामंत यांनी स्पष्ट केले.

मंत्री सामंत यांनी पुढे बोलताना सांगितले की, ‘कायमस्वरूपी मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे निर्णय घेतले आहेत, ते पूर्णपणे समाजाच्या हिताचे आहेत. या निर्णयामुळे OBC समाजाच्या आरक्षणाला अजिबात धक्का लागणार नाही, याची पूर्ण दक्षता महाराष्ट्र सरकारने घेतलेली आहे. जर मराठा आरक्षणाबाबत अजून काही प्रश्न शिल्लक राहिले असतील किंवा कुठे अन्याय होतो आहे असे मनोज जरांगे पाटील यांना वाटत असेल, तर त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी सरकार नेहमीच तयार आहे.’

हेही वाचा – Maharashtra MLC Election : फॉर्म्युला ठरला! विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचा जागावाटपासाठी मेगा प्लॅन; वाचा कोणाला किती जागा

विखे-पाटील यांच्या समितीकडून प्रश्नांवर काम; महामंडळाला 150 कोटींचा निधी
आरक्षणाच्या आणि मराठा समाजाच्या मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या विशेष समितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आहेत. उदय सामंत यांनी सांगितले की, या समितीमध्ये विखे-पाटील यांच्यासोबत मी स्वतः आणि शिवेंद्रराजे भोसले देखील आहोत. काही गोष्टींना कायदेशीर आणि तांत्रिक बाबींमुळे वेळ लागत असतो, तरीही समिती आणि सरकारने प्रामाणिकपणे हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. याचाच एक भाग म्हणून सरकारने कालच मराठा समाजाच्या महामंडळासाठी 150 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. ज्या ज्या ठिकाणी मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका घ्यावी लागते, तिथे सरकार सकारात्मक पावले उचलत आहे.

‘अनेकदा चर्चा केल्या; पण आंदोलन थांबवणे किंवा सुरू करणे माझ्या हातात नाही’
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर बोलताना सामंत म्हणाले की, गेल्या साडेतीन वर्षांमध्ये महाराष्ट्रातील आणि विशेषतः छत्रपती संभाजीनगरच्या पत्रकारांनी हा सगळा प्रवास जवळून पाहिला आहे. मी स्वतः अनेकदा जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे, त्यांच्याशी सकारात्मक चर्चा केल्या आहेत आणि अगदी त्यांच्यासोबत चहा पितानाचे फोटो व व्हिडिओ देखील व्हायरल झाले आहेत. त्यामुळे मी जाऊन सांगितले म्हणून ते आंदोलन सुरू करणार किंवा माझ्या सांगण्यावरून ते आंदोलन थांबवणार, अशी कोणतीही परिस्थिती नाही. आम्ही नेहमीच सरकारचा प्रतिनिधी म्हणून त्यांना समजावण्याचा आणि संवाद साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे, असे सांगत सामंत यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number