Bajrang Sonawane : ‘अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का?’; खासदार बजरंग सोनवणे यांचा खळबळजनक सवाल

बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी या अपघाताच्या स्वरूपावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, हा घातपात असण्याची शक्यता वर्तवली आहे.

Bajrang Sonawane : ‘अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का?’; खासदार बजरंग सोनवणे यांचा खळबळजनक सवाल

Bajrang Sonawane: दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचे गूढ दिवसागणिक वाढत चालले असून, आता या प्रकरणात ‘बॉम्बस्फोटा’चा संशय व्यक्त करण्यात आला आहे. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी या अपघाताच्या स्वरूपावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, हा घातपात असण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

“जमिनीला टेकण्यापूर्वीच स्फोट कसा?” सोनवणेंचे तार्किक प्रश्न
आज आयोजित पत्रकार परिषदेत खासदार सोनवणे यांनी अपघाताच्या वेळच्या सीसीटीव्ही फुटेजचा दाखला देत अनेक शंका मांडल्या. “विमान धावपट्टीवर उतरण्यापूर्वीच हवेत असताना स्फोट झाल्याचे फुटेजमध्ये दिसत आहे. जर विमान जमिनीला धडकलेच नव्हते, तर स्फोट कसा झाला?” असा सवाल त्यांनी केला. विमानाचा पुढचा भाग ज्या पद्धतीने छिन्नविच्छिन्न झाला आणि लोक बाहेर फेकले गेले, ते पाहता विमानात आधीच बॉम्ब ठेवला होता का, याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. तथापी, अपघाताच्या दिवशी सकाळी दादांना कोण भेटले आणि विमानाची सुरक्षा तपासणी कशी झाली, याची संपूर्ण माहिती सार्वजनिक करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा – Zilla Parishad Elections 2026: मतदानाच्या तोंडावर साताऱ्यात राजकीय संघर्ष; भाजप उमेदवाराच्या भावाकडून राष्ट्रवादी कार्यकर्त्याला मारहाण

तपासाची व्याप्ती वाढवण्याची मागणी
बजरंग सोनवणे पुढे म्हणाले की, ‘मी नकारात्मक विचार करणारा माणूस नाही, पण जे डोळ्यांना दिसतंय ते संशयास्पद आहे. इंजिनमध्ये बिघाड झाला की कोणीतरी कट रचला? या सर्व प्रकरणाचा तपास पारदर्शक पद्धतीने करून तो जनतेसमोर मांडला पाहिजे.’ दुसरीकडे, आमदार रोहित पवार यांनीही या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “आम्ही काही तांत्रिक माहिती मागवली आहे. 9 फेब्रुवारीनंतर मी यावर सविस्तर भाष्य करेन. काही अनुत्तरित प्रश्न आहेत, ज्याचा जाब आम्ही संबंधित यंत्रणांना नक्कीच विचारू,” असे रोहित पवार यांनी सांगितले. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number