US-Iran Conflict: हिंदी महासागरात युद्धाचा भडका! अमेरिकन हल्ल्यानंतर दुसरी इराणी युद्धनौका संकटात; श्रीलंकेकडे मागितली तातडीची मदत

अमेरिकन पाणबुडीने इराणी युद्धनौका 'IRIS DENA' वर टॉर्पेडो हल्ला करून ती बुडवल्यानंतर, आता त्याच भागातील दुसरी इराणी युद्धनौका संकटात सापडली आहे.

US-Iran Conflict: हिंदी महासागरात युद्धाचा भडका! अमेरिकन हल्ल्यानंतर दुसरी इराणी युद्धनौका संकटात; श्रीलंकेकडे मागितली तातडीची मदत

US-Iran Conflict: हिंदी महासागरातील आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात अमेरिका आणि इराणमधील लष्करी तणावाने भीषण वळण घेतले आहे. अमेरिकन पाणबुडीने इराणी युद्धनौका 'IRIS DENA' वर टॉर्पेडो हल्ला करून ती बुडवल्यानंतर, आता त्याच भागातील दुसरी इराणी युद्धनौका संकटात सापडली आहे. या युद्धनौकेने श्रीलंकेच्या सागरी हद्दीत प्रवेश करण्यासाठी आणि तातडीच्या मदतीसाठी श्रीलंका सरकारकडे अधिकृत आवाहन केले आहे. श्रीलंकेच्या संरक्षण मंत्रालयाने या वृत्ताला दुजोरा दिला असून योग्य ती कार्यवाही सुरू असल्याचे म्हटले आहे.

अमेरिकेचा टॉर्पेडो हल्ला आणि 80 खलाशांचा मृत्यू
दरम्यान, बुधवारी हिंदी महासागरात अमेरिकेच्या एका पाणबुडीने इराणी युद्धनौकेवर भीषण टॉर्पेडो हल्ला केला, ज्यामध्ये 'IRIS DENA' ही युद्धनौका समुद्रतळाशी गेली. श्रीलंकेच्या नौदलाने दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सुमारे 80 इराणी खलाशांचे मृतदेह श्रीलंकेच्या दक्षिण किनाऱ्यावरून बाहेर काढण्यात आले आहेत. मृतदेहांचे शवविच्छेदन गॅले येथील करापिटिया रुग्णालयात केले जाणार आहे. हे नौदल पथक भारताच्या विशाखापट्टणम येथे सराव करून मायदेशी परतत असताना हा हल्ला झाला. अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी या हल्ल्याची माहिती दिली आहे.

दुसऱ्या युद्धनौकेची मदतीसाठी याचना
पहिल्या युद्धनौकेवरील हल्ल्यानंतर त्याच ताफ्यातील दुसरी युद्धनौका आता श्रीलंकेच्या विस्तारित आर्थिक क्षेत्रात (EEZ) मदतीची वाट पाहत उभी आहे. श्रीलंकेच्या संसदेत विरोधी पक्षनेते साजित प्रेमदासा यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सरकारी प्रवक्ते नलिंडा जयतिस्सा म्हणाले की, "आम्ही या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. जहाजावरील कर्मचाऱ्यांचे प्राण वाचवण्यासाठी आणि प्रादेशिक शांतता राखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजनांचा विचार केला जात आहे." या युद्धनौकेने आपत्कालीन संदेश (SOS) पाठवून आश्रय मागितला आहे.

हेही वाचा – Iran-Israel-US War Effect on India : इराण-इस्रायल युद्धामुळे भारताच्या 'या' भागात परिस्थिती बिकट, 7 मार्चपर्यंत शाळा, कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय

जखमींवर उपचार आणि आंतरराष्ट्रीय पडसाद
हल्ल्यातून वाचलेल्या काही इराणी खलाशांना श्रीलंकेच्या नौदलाने यशस्वीरित्या बाहेर काढले असून त्यांच्यावर करापिटिया रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या मते, त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. या घटनेमुळे हिंदी महासागरात आंतरराष्ट्रीय राजकारण तापले असून, श्रीलंकेने मानवतावादी दृष्टिकोनातून मदत करण्याचे संकेत दिले आहेत. मात्र, अमेरिकेच्या आक्रमक भूमिकेमुळे श्रीलंकेसमोर राजनैतिक पेच निर्माण झाला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number