UK Travel Rules: लंडनला जायचंय ? मग मोजावे लागणार जास्तीचे पैसे; ब्रिटनचे नवीन ‘प्रवास धोरण’ नेमके काय आहे?

ज्या प्रवाशांना ब्रिटनमध्ये जाण्यासाठी व्हिसाची गरज नाही, त्यांना आता प्रवासापूर्वी हे डिजिटल परमिट घेणे बंधनकारक असेल.

UK Travel Rules: लंडनला जायचंय ? मग मोजावे लागणार जास्तीचे पैसे; ब्रिटनचे नवीन ‘प्रवास धोरण’ नेमके काय आहे?

UK Travel Rules: जर तुम्ही ब्रिटन (UK) प्रवासाचे नियोजन करत असाल, तर आता केवळ पासपोर्ट असून चालणार नाही. ब्रिटिश सरकारने 85 देशांतील प्रवाशांसाठी इलेक्ट्रॉनिक ट्रॅव्हल ऑथोरायझेशन (ETA) अनिवार्य केले आहे. ज्या प्रवाशांना ब्रिटनमध्ये जाण्यासाठी व्हिसाची गरज नाही, त्यांना आता प्रवासापूर्वी हे डिजिटल परमिट घेणे बंधनकारक असेल. जर तुमच्याकडे आवश्यक कागदपत्रे किंवा ETA नसेल, तर तुम्हाला विमानतळावरील चेक-इन काउंटरवरच रोखले जाईल.

काय आहे ही ETA योजना?
ETA (Electronic Travel Authorization) ही एक डिजिटल पूर्व-प्रवास मंजुरी प्रणाली आहे. 2023 मध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुरू झालेली ही योजना आता काटेकोरपणे लागू करण्यात आली आहे. या अंतर्गत प्रवाशांना साधारणपणे 16 पौंड (सुमारे 1,800 ते 2,000) शुल्क भरून ऑनलाइन अर्ज करावा लागेल. एकदा मंजुरी मिळाल्यानंतर, प्रवाशांना ब्रिटनमध्ये 6 महिन्यांपर्यंत राहण्याची परवानगी दिली जाईल. ही प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल असून सरकारी वेबसाइटवरून अर्ज करता येतो.

या देशांना लागू होणार नियम
हा नवीन नियम अमेरिका, कॅनडा, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूर यांसारख्या विकसित देशांसह एकूण 85 देशांच्या नागरिकांना लागू असेल. ब्रिटिश गृह कार्यालयाच्या मते, देशाच्या इमिग्रेशन प्रणालीचे आधुनिकीकरण करण्यासाठी आणि सुरक्षा धोके कमी करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. यामुळे देशात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची माहिती सरकारकडे आधीच उपलब्ध असेल.

कोणाला मिळणार सूट?
ब्रिटीश आणि आयर्लंडचे नागरिक, तसेच ज्यांच्याकडे ब्रिटनमध्ये राहण्याचा वैध अधिकार किंवा व्हिसा आहे, त्यांना या नियमातून सूट देण्यात आली आहे. मात्र, इतर सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांकडे ETA, eVisa किंवा इतर वैध कागदपत्रे नसल्यास विमान कंपन्या त्यांना बोर्डिंग नाकारतील.

हेही वाचा – Donald Trump: टॅरिफनंतर आता डिपोर्टेशनलाही ब्रेक! ट्रम्प यांची 'थर्ड कंट्री' पॉलिसी बेकायदेशीर; न्यायालयाचा मोठा दणका

सुरक्षेसाठी उचललेले ऐतिहासिक पाऊल
स्थलांतर मंत्री माइक टॅप यांनी या बदलाचे समर्थन करताना म्हटले आहे की, ETA योजना ही ब्रिटनची सीमा सुरक्षा मजबूत करण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. ही प्रणाली प्रवाशांसाठी अधिक कार्यक्षम आणि आधुनिक सेवा सुनिश्चित करते. हा बदल युरोपियन युनियनच्या नवीन प्रवेश/निर्गमन प्रणालीशी (EES) सुसंगत असून, ब्रेक्झिटनंतर ब्रिटनच्या सीमा अधिक सुरक्षित आणि डिजिटल करण्याच्या उद्देशाने करण्यात आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number