Nashik School Fight: नाशिकमध्ये बाकावरून महापालिका शाळेतील लहान मुलांची रस्त्यावर तुफान हाणामारी; वाढत्या आक्रमकतेमुळे पालक चिंतेत

पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी एकमेकांवर हात उगारल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Nashik School Fight: नाशिकमध्ये बाकावरून महापालिका शाळेतील लहान मुलांची रस्त्यावर तुफान हाणामारी; वाढत्या आक्रमकतेमुळे पालक चिंतेत

Nashik School Fight: नाशिकच्या वडाळा गावातील महानगरपालिकेच्या शाळेत एका बाकावर (बेंच) बसण्यावरून सुरू झालेल्या साध्या वादाचे रूपांतर थेट रस्त्यावरील हाणामारीत झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी एकमेकांवर हात उगारल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली असून, शालेय वयातील मुलांमधील ही टोकाची आक्रमकता आता चिंतेचा आणि चर्चेचा विषय ठरली आहे.

नेमका प्रकार काय?
मिळालेल्या माहितीनुसार, वडाळा गावातील महानगरपालिकेच्या शाळेत एकाच बेंचवर बसण्यावरून काही विद्यार्थ्यांमध्ये बाचाबाची झाली होती. शाळेत सुरू असलेला हा वाद तिथेच न थांबता शाळा सुटल्यानंतरही कायम राहिला. शाळा सुटल्यावर अवघ्या 50 मीटर अंतरावर असलेल्या माळी गल्लीत या मुलांचे गट आमनेसामने आले आणि रागाच्या भरात या लहान मुलांनी एकमेकांवर हल्ला चढवला. हा राडा पाहून परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेत मध्यस्थी केली आणि मुलांना एकमेकांपासून सोडवले.

वाढती गुंडगिरी आणि पुनरावृत्तीचा धोका
केवळ 10 ते 12 वर्षांच्या मुलांमध्ये दिसणारी ही प्रवृत्ती पाहून पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, अशा प्रकारच्या छोट्या वादांचे पर्यवसान मोठ्या भांडणात होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेकदा अशी प्रकरणे पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचली आहेत. विद्यार्थ्यांमधील हे वाढते वैमनस्य भविष्यात गंभीर वळण घेऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा – Mantralaya Corruption: मंत्रालयातील भ्रष्टाचारावर ACB चा सर्जिकल स्ट्राईक; 6 लाखांची लाच घेताना अर्थ खात्याचा बडा अधिकारी गळाला

पालकांमध्ये घबराट आणि समुपदेशनाची मागणी
विद्यार्थ्यांमधील वाढती आक्रमकता रोखण्यासाठी पालकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. महापालिका शाळांनी विद्यार्थ्यांच्या वर्तणुकीवर कडक लक्ष ठेवावे, अशी मागणी होत आहे. तसेच, शिक्षण विभागाने तज्ज्ञांमार्फत मुलांचे समुपदेशन करून त्यांच्यातील रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी विशेष उपक्रम राबवावेत, अशी विनंती पालकांनी केली आहे. शाळांमध्ये संवाद आणि समजूतदारपणा वाढवण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज आता व्यक्त होत आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number