Vijay Sinha Attack: लखीसरायमध्ये उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा यांच्या ताफ्यावर हल्ला; राजद कार्यकर्त्यांवर गुंडगिरीचा आरोप

विजय सिन्हा निवडणूक प्रचारासाठी लखीसरायच्या ग्रामीण भागातून जात असताना काही अज्ञात लोकांनी त्यांच्या ताफ्यावर हल्ला चढवला.

Vijay Sinha Attack: लखीसरायमध्ये उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा यांच्या ताफ्यावर हल्ला; राजद कार्यकर्त्यांवर गुंडगिरीचा आरोप

Vijay Sinha Attack: बिहारचे उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा यांच्या ताफ्यावर लखीसरायमध्ये गुरुवारी हल्ला झाला. निवडणूक प्रचारादरम्यान त्यांच्या वाहनावर चिखल, दगड आणि जोडे फेकण्यात आले, अशी माहिती समोर आली आहे. या हल्ल्यानंतर राजकीय वातावरण तापले असून, सिन्हा यांनी थेट राजद कार्यकर्त्यांवर गुंडगिरीचा आरोप केला आहे. विजय सिन्हा निवडणूक प्रचारासाठी लखीसरायच्या ग्रामीण भागातून जात असताना काही अज्ञात लोकांनी त्यांच्या ताफ्यावर हल्ला चढवला. यावेळी घोषणाबाजी करत त्यांच्या गाडीवर चिखल आणि जोडे फेकण्यात आले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.

हा लोकशाहीवर हल्ला – विजय सिन्हा

उपमुख्यमंत्री सिन्हा यांनी पत्रकारांशी बोलताना तीव्र प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले राजदचे गुंड लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न करत आहेत. सत्तेत येण्याआधीच ही गुंडगिरी सुरू झाली आहे. अशा लोकांवर बुलडोझर कारवाई होईल. सिन्हा यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्याची घोषणा केली असून, घटनेत सहभागी असलेल्यांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे.

हेही वाचा – Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला धोका?; जवळच्या सहकाऱ्यांवर संशय, दोघे पोलिसांच्या ताब्यात

हल्ल्यानंतर सिन्हा यांनी लखीसरायचे पोलीस अधीक्षक (SP) यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. सिन्हा यांनी एसपीवर दुर्बल आणि निष्क्रिय असल्याचा आरोपही केला आहे. तथापी, विजय सिन्हा यांनी स्पष्टपणे म्हटले की, ‘हल्ल्यामागे राजद कार्यकर्त्यांचा हात आहे. ते आता मतदारांनाही मतदान केंद्रावर येऊ देत नाहीत. हे राजदचेच काम आहे.’  

हेही वाचा – Ajit Pawar Land Case: मोठी बातमी! अजित आणि पार्थ पवार यांच्या समोरील अडचणीत वाढ; मुख्यमंत्री म्हणाले “अनियमितता आढळली तर होणार कारवाई “

सीपीएम आमदारांच्याही गाडीवर दगडफेक

या घटनेनंतर काही तासांतच आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला. सीपीएमचे आमदार आणि मांझी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ. सत्येंद्र यादव यांच्या गाडीवर बनवार-जैतपूर परिसरात दगडफेक आणि हल्ला करण्यात आला. सुदैवाने, आमदार यादव सुरक्षित असून पोलिसांनी तातडीने सुरक्षा वाढवली आहे. पोलिसांनी घटनास्थळी अतिरिक्त फौज तैनात केली आहे. हल्लेखोरांचा शोध सुरू असून, सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. तथापी, याबाबत निवडणूक आयोगालाही माहिती देण्यात आली आहे. विजय सिन्हा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर बिहारचे राजकारण ढवळून निघाले आहे. एनडीएने या घटनेचा निषेध करत राजदवर “अराजकता निर्माण” केल्याचा आरोप केला आहे, तर राजदने प्रत्युत्तरात “हे निवडणुकीतील नाटक” असल्याचं म्हटलं आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number