Nagpur Manufacturing Hub: विदर्भाचा कायापालट होणार, नागपुरात महिंद्रा कंपनीचा 15,000 कोटींचा मेगा प्रोजेक्ट; वर्षाला धावणार 5,00,000 वाहने

या प्रकल्पासाठी सामंजस्य करार करण्यात आला. या प्रकल्पांतर्गत कंपनी पुढील 10 वर्षांत अंदाजे 15,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

Nagpur Manufacturing Hub: विदर्भाचा कायापालट होणार, नागपुरात महिंद्रा कंपनीचा 15,000 कोटींचा मेगा प्रोजेक्ट; वर्षाला धावणार 5,00,000 वाहने

Nagpur Manufacturing Hub: महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने ऑटो आणि ट्रॅक्टर क्षेत्रात आपली पकड अधिक मजबूत करण्यासाठी महाराष्ट्रात आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या उत्पादन केंद्राची घोषणा केली आहे. नागपूर येथे आयोजित "अ‍ॅडव्हान्टेज विदर्भ" शिखर परिषदेत महाराष्ट्र सरकार आणि महिंद्रा दरम्यान या प्रकल्पासाठी सामंजस्य करार करण्यात आला. या प्रकल्पांतर्गत कंपनी पुढील 10 वर्षांत अंदाजे 15,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून हा प्रकल्प विदर्भातील सुमारे 1,500 एकर जमिनीवर उभारला जाणार आहे.

एका वर्षात 5,00,000 वाहने तयार करण्याचे उद्दिष्ट
हा नवीन प्रकल्प अत्याधुनिक आणि 'नेक्स्ट जनरेशन' तंत्रज्ञानावर आधारित असेल. या प्लांटची वार्षिक क्षमता 5,00,000 हून अधिक वाहने आणि अंदाजे 1,00,000 ट्रॅक्टर तयार करण्याची असणार आहे. विशेष म्हणजे, या कारखान्यात केवळ पेट्रोल आणि डिझेल वाहनेच नव्हे, तर इलेक्ट्रिक वाहने (EV) आणि भविष्यातील प्रगत तंत्रज्ञानाची वाहने देखील उत्पादित केली जातील. यामुळे हा प्रकल्प महिंद्राचा देशातील सर्वात मोठा आणि प्रगत एकात्मिक प्लांट ठरेल.

'मेक इन इंडिया' आणि सप्लायर पार्कला बळकटी
उत्पादन वाढवण्यासाठी महिंद्रा छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे 150 एकरांवर एक भव्य 'पुरवठादार पार्क' (Supplier Park) विकसित करत आहे. हे पार्क नागपूरमधील नवीन प्लांटसह चाकण आणि नाशिकमधील विद्यमान प्रकल्पांना सुटे भाग आणि घटक पुरवण्याचे काम करेल. यामुळे देशांतर्गत उत्पादनाला गती मिळेल आणि 'मेक इन इंडिया' मोहिमेला मोठे बळ मिळेल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.

हेही वाचा – Gold Rate Today : सर्वसामान्यांनी सोनं खरेदी करायचं की नाही? सोन्याच्या दरात पुन्हा तेजी, किंमती गगनाला भिडल्या

विदर्भाच्या विकासाला मिळणार गती
महिंद्राचे ऑटो अँड फार्म सेक्टरचे सीईओ राजेश जेजुरीकर यांनी या प्रकल्पाला 'भविष्यकालीन पाऊल' म्हटले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गुंतवणुकीचे स्वागत करताना सांगितले की, या प्रकल्पामुळे विदर्भात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल. तसेच, ही गुंतवणूक महाराष्ट्रातील पोषक औद्योगिक वातावरणावर महिंद्राने दाखवलेला विश्वास दर्शवते, ज्यामुळे या प्रदेशाच्या आर्थिक विकासाला नवी गती मिळेल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number