Vaishali Darekar Resignation : उद्धव ठाकरे गटाला कल्याणमध्ये मोठा धक्का! खासदार श्रीकांत शिंदेंविरोधात लढणाऱ्या वैशाली दरेकर यांचा राजीनामा

कल्याण-डोंबिवलीतील महत्त्वाचा महिला चेहरा मानल्या जाणाऱ्या वैशाली दरेकर-राणे यांनी आपल्या पदाचा अचानक राजीनामा देऊन उद्धव ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का दिला आहे.

Vaishali Darekar Resignation : उद्धव ठाकरे गटाला कल्याणमध्ये मोठा धक्का! खासदार श्रीकांत शिंदेंविरोधात लढणाऱ्या वैशाली दरेकर यांचा राजीनामा

Vaishali Darekar Resignation : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील कल्याण-डोंबिवलीतील महत्त्वाचा महिला चेहरा मानल्या जाणाऱ्या वैशाली दरेकर-राणे यांनी आपल्या पदाचा अचानक राजीनामा देऊन पक्षाला मोठा राजकीय धक्का दिला आहे. त्यांनी थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून पदावरून मुक्त करण्याची स्वेच्छेने विनंती केली आहे. पत्रात जरी त्यांनी 'वैयक्तिक कारणे' पुढे केली असली, तरी अवघ्या काही तासांपूर्वी मुंबईतील 'मातोश्री' निवासस्थानी कल्याण-कळव्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या अंतर्गत वाद आणि राड्याची या राजीनाम्यामागे पार्श्वभूमी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

कल्याणमधील स्थानिक पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी अन् कार्यकर्त्यांमधील असंतोष
गेल्या दोन दिवसांपूर्वी कल्याण परिसरातील पक्षाच्या काही प्रमुख स्थानिक पदाधिकाऱ्यांची पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली होती. यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये आणि स्थानिक नेतृत्वामध्ये आधीपासूनच तीव्र नाराजी आणि असंतोष पसरला होता. या वाढत्या अंतर्गत वादामुळे आणि पक्षातील दुटप्पी कारभारामुळे कंटाळूनच वैशाली दरेकर यांनी महिला जिल्हा संघटक पदाचा राजीनामा देण्याचे कठोर पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा – Shiv Sena UBT Matoshree Meeting : 'मातोश्री'वरील बैठकीत पदाधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी! संतापलेल्या उद्धव ठाकरेंनी घेतला समाचार

लोकसभेत 3.5 लाख मते घेत श्रीकांत शिंदेंना दिली होती तगडी टक्कर
कल्याण लोकसभा निवडणुकीत अत्यंत प्रतिकूल आणि आव्हानात्मक परिस्थितीत ठाकरे गटाने वैशाली दरेकर यांना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात रिंगणात उतरवले होते. या लढतीत अत्यंत आक्रमक प्रचार करत त्यांनी तब्बल 3.5 लाख (साडे तीन लाख) मते मिळवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवून एवढी मोठी मते घेतल्याबद्दल खुद्द उद्धव ठाकरे आणि पक्षाच्या वरिष्ठांनी त्यांचे कौतुक केले होते.

उद्धव ठाकरेंना पाठवलेल्या पत्रात वैशाली दरेकरांनी नेमके काय म्हटले?
उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात वैशाली दरेकर यांनी नमूद केले की, 'मी वैशाली दरेकर-राणे, गेल्या 2 वर्षांपासून महिला जिल्हा संघटक या पदावर निष्ठेने कार्यरत आहे. परंतु, सध्याच्या माझ्या वैयक्तिक जबाबदाऱ्या आणि कर्तव्यांमुळे मी या पदाला योग्य न्याय आणि पुरेसा वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे मी माझ्या महिला जिल्हा संघटक पदाचा स्वेच्छेने राजीनामा देत असून तो स्वीकारावा.'

हेही वाचा – Devendra Fadanvis: 'जनतेच्या पैशांची उधळपट्टी नको, विकासकामांवर भर द्या' ; मुख्यमंत्र्यांचा पदाधिकाऱ्यांच्या इनोव्हा प्रस्तावाला ब्रेक

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number