Vijay Hazare Trophy 2025 : 36 चेंडूत शतक…वय फक्त 14 वर्ष ! विजय हजारे ट्रॉफीत वैभव सूर्यवंशीने रचला जागतिक विक्रम

14 वर्षांच्या या वंडरबॉयने आपल्या तुफानी फलंदाजीने या दिग्गजांनाही प्रसिद्धीच्या झोतात मागे टाकले आहे.<br/>

Vijay Hazare Trophy 2025 : 36 चेंडूत शतक…वय फक्त 14 वर्ष ! विजय हजारे ट्रॉफीत वैभव सूर्यवंशीने रचला जागतिक विक्रम

Vijay Hazare Trophy 2025 :  भारतीय क्रिकेटमध्ये सध्या केवळ एकाच नावाची चर्चा आहे, ते म्हणजे वैभव सूर्यवंशी. बुधवारी विजय हजारे ट्रॉफीची दिमाखात सुरुवात झाली. एकीकडे विराट कोहली आणि रोहित शर्मा यांसारख्या दिग्गज खेळाडूंच्या देशांतर्गत क्रिकेटमधील पुनरागमनाकडे सर्वांचे लक्ष लागले होते, मात्र 14 वर्षांच्या या वंडरबॉयने आपल्या तुफानी फलंदाजीने या दिग्गजांनाही प्रसिद्धीच्या झोतात मागे टाकले आहे.

36 चेंडूत शतक; मोडले अनेक विक्रम

बिहारचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वैभवने अरुणाचल प्रदेशविरुद्ध मैदानावर धावांचा पाऊस पाडला. त्याने अवघ्या 36 चेंडूत धडाकेबाज शतक झळकावले. यासह लिस्ट-ए क्रिकेटच्या इतिहासात शतक झळकावणारा तो जगातील सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. वैभवने जेव्हा हे ऐतिहासिक शतक पूर्ण केले, तेव्हा त्याचे वय अवघे 14 वर्षे आणि 272 दिवस इतके होते.

भारतीय क्रिकेटमधील दुसरे सर्वात वेगवान शतक

वैभवने केवळ वयाचाच विक्रम मोडला नाही, तर वेगवान फलंदाजीचा नवा मापदंडही प्रस्थापित केला. लिस्ट-ए क्रिकेटमध्ये भारतीयाने केलेले हे दुसरे सर्वात वेगवान शतक ठरले आहे. त्याने अनमोलप्रीत सिंगच्या (35 चेंडू) विक्रमाच्या अगदी जवळ मजल मारली. विशेष म्हणजे, वैभवचा हा तडाखा शतकावरच थांबला नाही. त्याने केवळ 59 चेंडूत 150 धावांचा टप्पा ओलांडून द्विशतकाच्या दिशेने कूच केली आहे.

हेही वाचा – Ind Vs Nz: नव्या वर्षात न्यूझीलंडशी भिडणार टीम इंडिया! न्यूझीलंडचा 'हा' दिग्गज फलंदाज भारत दौऱ्यावर येणार नाही; मोठे कारण समोर

वैभवच्या खेळीची वैशिष्ट्ये 

आपल्या खेळीत त्याने आतापर्यंत 13 गगनभेदी षटकार आणि 16 नेत्रदीपक चौकार ठोकले आहेत. तथापी, विजय हजारे, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी, आयपीएल, युवा कसोटी आणि भारत 'अ' अशा सर्व स्तरांवर शतके झळकावण्याचा पराक्रम त्याने केला आहे. 19 वर्षांखालील आशिया कपमध्येही त्याने 171 धावांची खेळी करून आपली चमक दाखवली होती.

हेही वाचा – Delhi Capitals New Captain: विश्वचषक गाजवल्यानंतर आता दिल्ली कॅपिटल्सची धुरा 'या' खेळाडूकडे

भरपूर संयम आणि प्रचंड आक्रमकता यांचा संगम वैभवच्या फलंदाजीत पाहायला मिळत आहे. ज्या वयात मुले शालेय क्रिकेट खेळतात, त्या वयात वैभव वरिष्ठ गटाच्या स्पर्धांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गोलंदाजांची धुलाई करत आहे. विजय हजारे ट्रॉफीमधील त्याच्या या कामगिरीने निवड समितीचे लक्ष वेधून घेतले असून, तो भारतीय क्रिकेटचे भविष्य बदलणारा खेळाडू ठरू शकतो, असे बोलले जात आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number