Politics of Splitting Parties : तृणमूल अन् ठाकरे गटानंतर आणखी एका पक्षात फुट पडणार? अमित शाहांकडे पत्र पोहोचताच राजकीय भूकंप

देशाच्या राजकारणात सध्या विरोधी पक्षांना लागलेली गळती थांबताना दिसत नाही. पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस आणि महाराष्ट्रातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानंतर आता...

Politics of Splitting Parties : तृणमूल अन् ठाकरे गटानंतर आणखी एका पक्षात फुट पडणार? अमित शाहांकडे पत्र पोहोचताच राजकीय भूकंप

Politics of Splitting Parties : देशाच्या राजकारणात सध्या विरोधी पक्षांना लागलेली गळती थांबताना दिसत नाही. पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस आणि महाराष्ट्रातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानंतर आता उत्तर प्रदेशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पक्षातही (SP) मोठी फूट पडणार असल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला आहे. उत्तर प्रदेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणि सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे (SBSP) अध्यक्ष ओमप्रकाश राजभर यांनी हा दावा केल्यामुळे उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. आधी ममता बॅनर्जी, मग उद्धव ठाकरे आणि आता अखिलेश यादव यांच्या पक्षाला सुरुंग लागण्याच्या या चर्चेने देशाचे राजकारण पुन्हा तापले आहे.

रामगोपाल यादव यांनी अमित शाह यांना पत्र लिहिल्याचा खळबळजनक आरोप
मंत्री ओ. पी. राजभर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि सपाचे ज्येष्ठ नेते रामगोपाल यादव यांच्यात गुप्त व्यवहार सुरू असल्याचा आरोप केला आहे. राजभर म्हणाले की, 'फक्त महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवू नका, आता उत्तर प्रदेशची पाळी आली आहे. रामगोपाल यादव यांनी गृहमंत्री अमित शाह यांना एक अत्यंत महत्त्वाचे पत्र लिहिले आहे.' या पत्राद्वारे त्यांनी समाजवादी पक्षाच्या काही खासदारांची नावे शाह यांच्याकडे सुपूर्द केली असून, या खासदारांना तुमच्यासोबत (भाजप आघाडीत) सामील करून घ्यावे, अशी विनंती केल्याचा दावा राजभर यांनी केला आहे. तसेच रामगोपाल यादव यांनी त्या पत्रात नेमके काय लिहिले आहे, हे स्वतःहून जनतेसमोर जाहीर करावे, असे आव्हानही त्यांनी दिले.

अखिलेश यादव यांच्यावरील घोटाळ्यांच्या चौकशीमुळे बचावात्मक पावले?
समाजवादी पक्षातील या संभाव्य बंडामागे केंद्रीय तपास यंत्रणांचा (CBI) दबाव असल्याचे संकेत राजभर यांनी दिले आहेत. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांचे नाव एका मोठ्या खाण घोटाळ्याच्या चौकशीत आल्यामुळेच पक्षाकडून ही बचावात्मक पावले उचलली जात असल्याचा थेट आरोप त्यांनी केला. सीबीआयने खाण घोटाळ्याच्या प्रकरणात अखिलेश यादव यांचे नाव घेतले आहे, याकडे लक्ष वेधत राजभर यांनी 'गोमती रिव्हरफ्रंट घोटाळ्यात अद्याप कोणी तुरुंगात गेले का?' असा खोचक सवालही उपस्थित केला. या घोटाळ्यांच्या चौकशीच्या भीतीनेच आपले खासदार वाचवण्यासाठी आणि स्वतःचा बचाव करण्यासाठी सपा नेतृत्व दिल्लीच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला.

हेही वाचा – Naresh Mhaske : खासदारांनंतर आता नगरसेवकही शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर? लवकरच 'ऑपरेशन टायगर 3'; म्हस्केंचा दावा

समाजवादी पक्षाचा पलटवार; सर्व आरोप बिनबुडाचे आणि तथ्यहीन
ओ. पी. राजभर यांच्या या खळबळजनक आणि वादग्रस्त दाव्यानंतर समाजवादी पक्षाने अत्यंत आक्रमक पवित्रा घेत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. सपाचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. अनुराग भदोरिया यांनी राजभर यांच्यावर जोरदार पलटवार केला. भदोरिया म्हणाले की, 'राजभर यांना नक्की काय झाले आहे, हे मला माहीत नाही. ते प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि राजकीय फायद्यासाठी समाजवादी पक्षाबाबत अत्यंत बिनबुडाचे, खोटे आणि तथ्यहीन दावे करत आहेत.' रामगोपाल यादव यांनी असे कोणतेही पत्र लिहिलेले नाही आणि पक्ष पूर्णपणे एकजूट असल्याचे सपातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

देशातील विरोधी पक्षांमध्ये अस्वस्थता; आगामी राजकारणाकडे लक्ष
सध्या संपूर्ण देशातील प्रमुख विरोधी पक्षांमध्ये मोठी पडझड आणि अंतर्गत संघर्ष पाहायला मिळत आहे. एकीकडे उत्तर प्रदेशात सपाबाबत दावे-प्रतिदावे सुरू असताना, दुसरीकडे महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्येही विरोधी पक्षांसमोर आमदारांना आणि खासदारांना टिकवून ठेवण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे. सत्ताधारी पक्षांकडून केंद्रीय यंत्रणांचा वापर करून प्रादेशिक पक्ष संपवले जात असल्याचा आरोप विरोधक करत आहेत, तर दुसरीकडे अंतर्गत नाराजीमुळे ही फूट पडत असल्याचा दावा सत्ताधारी करत आहेत. या पार्श्वभूमीवर, आगामी काळात उत्तर प्रदेश आणि देशाच्या राजकारणाला कोणती नवी दिशा मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा – Gulbrao Patil: 'राऊतांच्या हाती सूत्रे गेली अन् पक्षाची अधोगती झाली…'; खासदार फुटीवरून गुलाबराव पाटलांची जहरी टीका

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number