जगायचे असेल तर 48 तासात बाहेर पडा; अमेरिकेच्या इशाऱ्याने जग हादरले! इराण-अमेरिका युद्धात आता काय होणार?

जॉर्डनमधील अमेरिकन लष्करी तळावर इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर येथील परिस्थिती आणखी चिघळली आहे. आता अमेरिकेच्या इशाऱ्यानंतर जगभरातील देश अलर्ट मोडवर आले आहेत.

जगायचे असेल तर 48 तासात बाहेर पडा; अमेरिकेच्या इशाऱ्याने जग हादरले! इराण-अमेरिका युद्धात आता काय होणार?

US Embassies-in-iraq Alert Americans : इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष आता अत्यंत धोकादायक वळणावर पोहोचला असून, युद्धाचा भडका वाढल्याचे चित्र दिसत आहे. या तणावपूर्ण वातावरणात अमेरिकेने आपल्या नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि तातडीचे आदेश जारी केले आहेत. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, अमेरिकन दूतावासाने आपल्या लोकांना जीव वाचवण्यासाठी देश सोडण्याचा इशारा दिला आहे.

बगदादमध्ये मोठ्या हल्ल्याची शक्यता: 48 तासांची मुदत
अमेरिकन दूतावासाने इराकमध्ये राहणाऱ्या आपल्या नागरिकांना पुढील 48 तासांच्या आत देश सोडण्याचे थेट आदेश दिले आहेत. बगदादमध्ये कोणत्याही क्षणी मोठा हल्ला होऊ शकतो, अशी कुणकुण लागल्याने ही खबरदारी घेण्यात आली आहे. इराकमध्ये इराणला पाठिंबा देणारे अनेक दहशतवादी गट सक्रिय असून, ते अमेरिकन नागरिकांना लक्ष्य करू शकतात, अशी भीती व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, अवघ्या 2 दिवसांपूर्वीच बगदादमध्ये एका अमेरिकन पत्रकाराचे अपहरण झाल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.

हेही वाचा – Iran US War Effect: अमेरिकेशी दुरावा वाढताच सौदीने धरला रशियाचा हात; ट्रम्प यांच्या आक्रमक भूमिकेनंतर पुतिन-सलमान यांच्यातील चर्चेने जागतिक राजकारण तापले

जॉर्डनमधील हल्ला आणि अमेरिकेचा पलटवार
जॉर्डनमधील अमेरिकन लष्करी तळावर इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर येथील परिस्थिती आणखी चिघळली आहे. या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यानंतर अमेरिकेने अधिक घातक हल्ले करण्याची धमकी दिली आहे. अमेरिकन नागरिकांच्या सुरक्षेसाठी अमेरिका सध्या मध्य पूर्वेतील प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवून आहे. अमेरिकेने आपले हल्ले अधिक तीव्र केल्यामुळे आता जगभरातील देश 'अलर्ट मोड'वर आले असून, काहीतरी भयंकर घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

युद्धाची भीषणता आणि जागतिक चिंता
एकीकडे संपूर्ण जग हे युद्ध थांबवण्याची मागणी करत असताना, दुसरीकडे इराण आणि अमेरिका दोघेही मागे हटायला तयार नाहीत. इराणकडून अमेरिकेच्या लष्करी तळांना सातत्याने टार्गेट केले जात आहे, तर अमेरिकेनेही आपल्या शत्रूंना चोख प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. बगदाद हे इराकमधील महत्त्वाचे केंद्र असल्याने तिथून अमेरिकन नागरिकांचे बाहेर पडणे आता अनिवार्य झाले आहे. या वाढत्या संघर्षामुळे जगासमोर मोठे संकट उभे राहिले असून, ही युद्धजन्य परिस्थिती कधी निवळेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा – Afghanistan Pakistan War: अफगाण सैन्याने तोफखाना आणि रणगाड्यांनिशी पाकिस्तानला हादरवले; सीमेवर रक्ताचा सडा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number